शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

सातारा जिल्ह्यातील जनता बँक, मायणी अर्बनसह १५ संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार

By नितीन काळेल | Updated: May 11, 2023 11:51 IST

बाजार समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय तोपर्यंतच आता १५ संस्थांची निवडणूक होणार

सातारा : जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय तोपर्यंतच आता १५ संस्थांची निवडणूक होणार आहे. यातील बहुतांशी संस्थांची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण, एखाद्या-दुसऱ्या संस्थेची निवडणूक लागली तरी चांगलाच धुरळा उडणार आहे. या संस्थांत साताऱ्यातील जनता बँक, खटावमधील मायणी अर्बन, कऱ्हाडच्या पी. डी. पाटील बँकेचा समावेश आहे, तर यासाठी अर्ज स्वीकृतीस सुरुवातही झाली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पुढे गेल्याने राजकीय वातावरण थंड आहे. पण, काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील ९ बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय धुरळा चांगलाच उडाला होता. आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकांनीही हातात हात घातल्याचे दिसले. ही राजकीय लढाई होती. पण, आता सहकारातील लढाईही पाहायला मिळणार आहे. कारण, जिल्ह्यातील १५ सहकारी संस्थांची निवडणूक सुरू झालेली आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बँकांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित संस्थेची निवडणूक बिनविरोध न झाल्यास पुन्हा एकदा धुरळा उडणार हे निश्चित आहे.सातारा शहराची अर्थवाहिनी म्हणून जनता सहकारी बँकेकडे पाहिले जाते. या बँकेची निवडणूकही जाहीर झाली आहे. ११ मेपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू होणार आहे. दि. १७ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर निवडणूक बिनविरोध न झाल्यास दि. १७ जूनला मतदान होऊन दि. १८ ला मतमोजणी होणार आहे. खटाव तालुक्यातील दि मायणी अर्बन को-ऑप बँकेचीही निवडणूक होत आहे. या बँकेच्याही शाखा आहेत. त्यामुळे येथेही निवडणूक होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. या बँकेसाठी १० मेपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे, तर निवडणूक झाल्यास ११ जूनला मतदान होणार आहे.कऱ्हाडमधील पी. डी. पाटील सहकारी बँकेवर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व आहे. आता या बँकेचीही निवडणूक सुरू झाली आहे. बुधवारपासूनच अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे, तर या बँकेसाठी ११ जूनला मतदान होणार आहे, तर १२ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील या मोठ्या बँकांबरोबरच अनेक संस्थांचीही निवडणूक होत आहे. यामध्ये साताऱ्यातील रयत सेवक को-ऑप. स्टोअर्स, ग्राहक संघ सेवक सहकारी पतसंस्था सातारा, सातारा तालुका औद्योगिक बहुद्देशीय ग्रामोद्योग सहकारी संस्था. खटाव तालुक्यातील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेचीही निवडणूक होत आहे. त्याचबरोबर माण तालुक्यातील कुकुडवाडच्या श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था, कऱ्हाडमधील कराड जनता सहकारी होलसेल कन्झ्युमर्स सोसायटी, कृष्णा सरिता महिला घाऊक व किरकोळ सहकारी संस्था, शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था तसेच कऱ्हाड तालुक्यातीलच वाठारच्या शिवतेज मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि कृष्णा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची निवडणूक होत आहे. कऱ्हाडमधीलच अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयीन सहकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचीही निवडणूक जाहीर झाली आहे.कऱ्हाडमधील आठ संस्थांची निवडणूक...जिल्ह्यातील सहकारामधील १५ संस्थांची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक आठ संस्था या कऱ्हाड तालुक्यातील आहेत, तर यानंतर सातारा तालुक्याचा क्रमांक लागतो. साताऱ्यातील चार, खटावमधील दोन आणि माण तालुक्यातील एका संस्थेची निवडणूक होत आहे. यासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक