शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कासची फुलं पाहताय? 100 रुपये काढा!

By admin | Updated: August 2, 2016 00:59 IST

यंदाच्या हंगामातील तिकीट दर जाहीर : पर्यटकांची पावले लागली वळू; तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू

सातारा / पेट्री : वरचेवर लोकप्रिय होत चाललेले कासपठार आता महागडेही बनले आहे. यंदाच्या हंगामात सुट्टीच्या दिवशी कासची फुलं पाहण्यासाठी दरडोई तब्बल १०० रुपये मोजावे लागणार असून ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवेश शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगचेही दर वाढविण्याचा निर्णय वनखात्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक सौंदर्य कायमस्वरूपी जपण्यासाठी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीस पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण संस्थेशी संबंधित सदस्य उपस्थित होते. १० आॅगस्टपासून कास फुलांचा हंगाम सुरू होत असून शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी दिवशी जास्तीत जास्त तीन तासांसाठी १२ वर्षांवरील सर्वांना प्रतिव्यक्ती १०० रुपये फी आकारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. इतर दिवशी हाच दर ५० रुपये असणार आहे. दुचाकी वाहनांना १० रुपये, चारचाकी वाहनांना ५० रुपये तर मिनीबससह सर्व मोठ्या वाहनांना १०० रुपये प्रति चार तास असा दर आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. कॅमेराशुल्क तीन तासांसाठी १०० रुपये तर गाईडशुल्क १० व्यक्तींकरिता १०० रुपये असेही दर पुष्पप्रेमींसाठी आकारण्यात येणार आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी) कासवर फुलांच्या बहराला प्रारंभपेट्री : कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच परराज्यातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशा निळ्या, जांभळ्या, लाल, पांढऱ्या रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर अशा विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. सध्या पांढऱ्या रंगांची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाळा ऋतूचा आनंद घेत आहेत. वजराईला पोलिस अधिकाऱ्यांची भेट वजराई धबधब्यावरून कास आणि भांबवली या गावांमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी कास परिसरात पर्यटकांची कोणतीही फसवणूक होत नसल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल किर्दत यांनी दिली. देशातील सर्वात उंच असलेल्या वजराई धबधब्यासाठी कास आणि भांबवली ग्रामस्थांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कास मंदिराजवळ ‘कास वजराई धबधबा’ असा फलक लावून पर्यटकांची कोणतीही फसवणूक होत नसून याबाबत मेढा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही समक्ष भेट देऊन वास्तवातील सर्व माहिती जाणून घेतली आहे. तरी पर्यटकांनी बिनधास्तपणे या परिसराचा लाभ घ्यावा, असे आवाहन किर्दत यांनी केले आहे.