शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

धोमची सुरक्षा रामभरोसे, पथदिवे बंद; फ्यूज बॉक्स सताड उघडे

By admin | Updated: July 16, 2017 16:02 IST

उपाययोजना न केल्यास आंदोलन, भाजयुमोचा इशारा

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. १५ : तालुक्यातील मुख्य सिंचनाचा स्त्रोत म्हणून धोम-बलकवडी व नागेवाडी या धरणांकडे पाहिले जाते. या धरणाच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्त्व असताना पाटबंधारे खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू आहे. तसेच धरणाच्या भिंतीवरील पथदिवे बंद असून, फ्यूज बॉक्स उघडे पडलेले आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने धोम पांटबंधारे विभाग, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, धोम धरणासह इतर धरणांच्या पाण्यावर हजारो नागरिकांसह लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या तालुक्यातील सर्वच धरणांच्या सुरक्षेकडे मात्र धोम पाटबंधारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. लाखो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न तालुक्यातील धरणांवर अवलंबून असताना पाटबंधारे खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.धोम धरणात अनेक वर्षांपासून नौकाविहार सुरू असून, नौकाविहाराचा ठेका घेणाऱ्यांकडे अधिकृत परवाना आहे का? नौकाविहार करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? धोम धरणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, ते कोणाच्या परवानगीने करण्यात आले आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू असते. ह्यआओ-जाओ घर तुम्हाराह्ण अशी काहीशी परिस्थिती याठिकाणी आहे. त्यांना रोखणारे कोणी नाही. याला जबाबदार कोण?

धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीटलाईट बंद अवस्थेत असून, फ्यूजबॉक्स सताड उघडे पडलेले आहेत. या सर्व बाबींकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, युवकचे जिल्हा सरचिटणीस मयूर नळ, राकेश फुले, अली आगा, महेश कोकरे, संतोष भागवत आदींच्या सह्या आहेत. धोम धरणाच्या सुरक्षेसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटक असो किंवा इतर कोणीही भिंतीवर येण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही. धरण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना वेळेत रोखले जाते. धरणाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात आहे.- व्ही. बी. जाधव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग वाई