शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा झेडपी भरतीचा दुसरा टप्पा १५ ऑक्टोबरपासून, पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी झाली परीक्षा 

By नितीन काळेल | Updated: October 13, 2023 18:47 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषद वर्ग तीनची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ ...

सातारा : सातारा जिल्हा परिषद वर्ग तीनची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ सहाय्यकांची झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील आठ संवर्गाच्या या परीक्षेनंतर आता दि. १५ आॅक्टोबरपासून परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यासाठीही जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षा होणार आहे.राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील रिक्त ९७२ जागांसाठी नोकर भरती होत आहे. यासाठी विविध विभागातील २१ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेतील नोकरीसाठी ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ८ संवर्गासाठी परीक्षा झाली. यामध्ये रिंगमन (दोरखंडवाला), लेखा वरिष्ठ सहाय्यक, सांख्यिक विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा झाली. तर दि. ११ रोजी तीन संवर्गासाठी परीक्षा झाली. यामधील लघुलेखक निम्नश्रेणीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज भरला होता. यातील एकजण गैरहजर राहिल्याने १० जण परीक्षेसाठी उपस्थित होते. लघुलेखक उच्चश्रेणीतही ११ जण अर्जदार होते. त्यातील आठजणांनी परीक्षा दिली. तर तिघेजण अनुपस्थित राहिले. तर लेखाच्या कनिष्ठ सहाय्यक संवर्गासाठी ३१० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील ५८ गैरहजर राहिल्याने २५२ जणांनी परीक्षा दिली. आता या नाेकर भरतीचा दुसरा टप्पा दि. १५ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. १५ आणि १७ आॅक्टोबरला परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील सातारा शहरात दोन आणि कऱ्हाडमधील एका केंद्रावर या परीक्षा होत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद