शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला शॅमेलियन जातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:59 IST

अजिंक्यतारा किल्ल्यावर रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. हा शॅमेलियन शाहूनगरमधील निसर्गमित्र अमोल कोडक यांच्या दृष्टीस पडला.

ठळक मुद्देसरडाच्या प्रजाती रक्षणासाठी प्रयत्न : निसर्गमित्र अमोल कोडक यांनी केला कॅमेराबंदरंग बदलणारा गिरगीट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखले जाते. तो झाडावर राहतो, तर कधी-कधी आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. हा शॅमेलियन शाहूनगरमधील निसर्गमित्र अमोल कोडक यांच्या दृष्टीस पडला. हा सरडा वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.

सातारा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. यामध्ये नानाविध प्रजातीचे साप, पशुपक्षी सरपटणारे प्राणी या बरोबरच बिबट्यासारख्या वन्यजीवांचे वास्तव्य आहे. या परिसरात सध्या शॅमेलियन दर्शन देऊ लागला आहे. अमोल कोडक यांनी त्याला कॅमेराबद्ध केलं आणि ‘लोकमत’ला ते छायाचित्र उपलब्ध करून दिलं.शॅमेलियन हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो नाहीतर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो.

या सरड्याची माहिती मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी दिली. या सरड्याला रंग बदलणारा गिरगीट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखले जाते. तो झाडावर राहतो, तर कधी-कधी आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो. कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेपटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो.

या सरड्याचं वेगळेपण अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राण घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी ‘ज्युरासिक पार्क’ पिक्चरमधल्या डायनोसार्सची आठवण करून देणारा याचा जबडा असं त्याचं रुपडं असतं. शॅमेलियनची जीभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जीभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. त्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात.

म्हणजे याचं भक्ष्य दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलून हळूच जबडा उघडून थोडीच जीभ पुढे काढून तयार राहतो. हे सगळं अगदी सावकाश सुरू असतं. मात्र नंतर एकाएकी आपल्यालाच काय, त्या भक्ष्यालापण कळत नाही की भक्ष्याची जागा शॅमेलियनच्या तोंडात कशी? याची आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जीभ आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते. यालाच शॅमेलियनचं जीभ फेकणं नी परत आत घेणं म्हणतात. याच पद्धतीने मस्तपैकी किडे मकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे मुंगळे मटकवून टाकतात.या सरड्याला काही धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी जणू निसर्गानेच त्याला रंगबदलाचे वरदान दिले आहे. मग अर्थातच सरुपता म्हणजेच केमोफ्लोज होऊन सभोवतालच्या रंगानुरूप होणं! त्याच्या शरीरातल्या रंगपेशी मेंदूकडून आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहूब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल