शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तुकाईचीवाडी शाळेचे ८१ वर्षांपासून ज्ञानदान- शाळा स्थापना दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:42 IST

अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.शाळा स्थापना दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सरस्वतीच्या प्रतिमेसह गावातून ग्रंथदिंडी काढली. यावेळी त्यांनी पारंपरिक पेहराव केला होता. महाराष्ट्रातील २५ महत्त्वाच्या किल्ल्यांचे पोस्टर्स व त्यांची सखोल माहिती दालनात लावण्यात आली होती.

कलादालनचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्या हस्ते व पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांच्या उपस्थितीत झाले. शाळेच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.शाळ व गाव जोडण्यासाठी आणि शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्यासाठी महिलांच्या पुढाकाराने महिला व विद्यार्थ्यांसाठी चालविले जाणारे शाळामित्र समन्वय ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. त्यांचे उद्घाटन शाळमित्र प्रकल्पाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. माणिक शेडगे याचे हस्ते व ओंकार देशमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सरपंच संजय पवार, उपसरपंच सुरेश करांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शेखर घार्गे, पोलीस पाटील सुहास काजळे यांनी परिश्रम घेतले.शेखर घार्गे यांनी सूत्रसंचालन केले. लहू कणसे यांनी प्रस्ताविक केले. मुख्याध्यापक वसंत मोहिते यांनी आभार मानले. 

शाळेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून शाळेत साहित्य कलादालन, गड-किल्ल्यांचे पोस्टर प्रदर्शन, शाळामित्र समन्वय ग्रंथालय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने शाळेच्या व गावच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर पडली आहे. यासाठी गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.- लहू कणसे,शिक्षक, तुकाईवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzp schoolजिल्हा परिषद शाळा