शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

म्हणे 'पैशांचा पाऊस पडतो' थापाड्या काका महाराजाला बेड्या! 

By दत्ता यादव | Updated: June 26, 2024 20:12 IST

36 लाखांचा घातला गंडा: फसवणारे टोळी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून एकाला ३६ लाखांना गंडा घालणाऱ्या पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज (वय ५४, रा. कापडे भवाणवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड) याला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने बुधवारी अटक केली.

अमित श्रीरंग शिंदे (वय ४२, रा. नाडे, ता. पाटण, सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांची तीन वर्षांपूर्वी काका महाराज याच्याशी ओळख झाली. त्यावेळी काका महाराज याने शिंदे यांना पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देतो. तसेच वीज पडलेल्या भांड्यावर अघोरी पूजा जादूटोणा चमत्कार करून त्याच्या विक्रीतूनही तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले. यानंतर शिंदे यांनी स्वत:कडचे काही पैसे तसेच इतर ओळखीच्या पाचजणांचे पैसे, असे मिळून तब्बल ३६ लाख रुपये काका महाराजला कधी रोख तर कधी ऑनलाइन पाठवले. हे पैसे दिल्यानंतर करोडे रुपये मिळतील, अशी आशा शिंदे यांच्यासह इतरांना होती. काका महाराज याने त्यांचा विश्वास बसवा म्हणून हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे टोळक्यांकडे नेले. त्या ठिकाणी त्या टोळक्याने प्रात्यक्षिक करून दाखविले. मात्र, पैशाचा पाऊस काही पडला नाही. हा प्रकार सप्टेंबर २०२१ला घडला. या प्रकारानंतर शिंदे यांच्या ओळखीने ज्यांनी पैसे यात गुंतवले होते. ते लोक शिंदे यांना पैसे मागू लागले. या प्रकारानंतर शिंदे यांनी २५ जून २०२४ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर माेरे, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये गेले. तेथे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता पोलादपूर येथे काका महाराज असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन काका महाराज याला अटक केली. 

चाैकट :  व्यावसायिक, कर्जबाजारी गळाला

पैशाचा पाऊस पाडून आमिष दाखविणाऱ्या या टोळीमध्ये दहा ते बाराजणांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. ही टोळी व्यावसायिक, कर्जबाजारी झालेल्या व्यक्तींना शोधून गंडा घालत होती. काका महाराज याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यानंतरच यामध्ये कोणा-कोणाचा सहभाग आहे, हे निष्पन्न होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले

टॅग्स :Satara areaसातारा परिसर