शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या बाजुच्या माॅलमध्ये बचत गटांना जागा देणार; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:35 IST

साताऱ्यातही भव्य माॅल उभारणार; मानीनी जत्रा उद्घटन 

नितीन काळेल सातारा : ‘उमेद’च्या माध्यमातून बचत गटातील महिला सक्षम होत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या राहणाऱ्या या महिलांना शासनही ताकद देणार आहे. यासाठी महामार्गाच्या बाजुच्या मोठ्या माॅलमध्ये बचत गटांचे स्टाॅल राहतील, त्यांना जागा मिळेल अशी भूमिका घेण्यात येईल. त्याचबरोबर साताऱ्यातही भव्य माॅल उभा करु, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित मिनी सरस मानीनी जत्रा आणि महाआवास अभियानाचा शुभारंभ मंत्री गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देश विकसीत होण्यासाठी महिला सक्षम होण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच संकल्पना पुढे आणली आहे. त्यामुळे लखपती दिदी योजना सुरू झाली. आतापर्यंतच्या इतिहासात सातारा जिल्हा कोठेही मागे राहलेला नाही. बचत गटांच्या चळवळीतही पुढेच आहे. उमेद अंतर्गत बचत गटातील महिला फक्त खाद्यपदाऱ्थ तयार करत नाहीत, तर त्यापुढेही त्या गेलेल्या आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणीत१४ कोटी रुपयांचा भव्य माॅल उभा राहत आहे. यामुळे ५०० बचत गटांची व्यवस्था होणार आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, उमेद अभियानाने महिलांना सक्षमपणे उभे केले आहे. बचत गटातील या महिलांसाठी महामार्गाच्या बाजुला माॅल तयार करावेत. याठिकाणी महिला बचत गटांनीही स्वत:चे मार्केट तयार करावे. तसेच बचत गटांनी आपल्या साहित्याची अधिक विक्री होण्यासाठी संपर्क क्रमांक द्यावा.

झेडपीच्या मोक्याच्या जागांकडे अनेकांचे लक्ष 

कार्यक्रमात मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक जागा आहेत. याची माहिती घेत असून तेथे काय करता येते का ते पाहिले जाईल असे स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा आहेत. त्याच्याकडे अनेकांचे लक्ष आहे, असेही निक्षून सांगितले. त्यामुळे गोरे यांचा रोख नेमका कोणाकडे ? याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरे