शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत-: मल्हारपेठ परिसरात आज पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:28 IST

कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी

ठळक मुद्देनागरिकांकडून प्रतिसाद

सातारा : कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. पाणी न सोडल्यामुळे शहरात कुठेही समस्या उद्भवली नसून, सातारकरांमधून पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कास धरणामध्ये ३ फुटांचा उपयुक्त तर ५ फुटांचा मृत पाणीसाठा आहे. यातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. कास योजनेवरील भागास दररोज १ इंच पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.राजवाडा, बुधवार नाका आणि व्यंकटपुरा पेठेत असणाºया या तीन टाक्यांमधून शुक्रवारी पाणीपुरवठा सोडण्यात आला नाही.

या तिन्ही टाकीमध्ये १५ लाख लिटर पाणीसाठा असतो. हा पाणीसाठा न सोडल्यामुळे पहिल्याच दिवशी १५ लाख लीटर पाण्याची बचत झाली. संत कंबीर सोसायटी, पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्ममावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ, धस कॉलनी, दस्तगीर कॉलनी या परिसरामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही.

या परिसरात राहणाºया नागरिकांना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पूर्वकल्पना दिल्यामुळे नागरिकांनी घरात एक दिवसाचा पाणीसाठा करून ठेवला होता. त्यामुळे पाण्याची काटकसर करून नागरिकांनी पाणी वापरले. परिणामी या परिसरातून एकही तक्रार नागरिकांकडूनच नव्हे तर एकाही नगरसेवकाने केली नसल्याचे समोर आले. पहिल्या दिवशी पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले. पाणी बचतीची आज यांची बारी...मल्हार पेठ, बडेकर वस्ती, नकाशपुरा, सावकार गॅरेज परिसर, शनिवार पेठ या परिसरामधील लोकांची पाणी बचतीची शनिवार दि. ११ रोजी बारी आहे. या भागामध्ये पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी