शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सातारी बाजारात प्लास्टिकचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:21 PM

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अन्नाच्या शोधात वन्य किंवा भटके प्राणी कचराकुंडी शोधत जातात, हे अनेकांनी पाहिलेय; पण सोनगाव कचरा डेपोमध्ये पाळीव गायी चरायला जातात. शहराची घाण येऊन पडणाºया या डेपोत चरताना या गायींच्या पोटात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या जात आहेत. शस्त्रक्रियेद्वारे या पिशव्या बाहेर काढण्याची वेळ मालकांवर आली ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अन्नाच्या शोधात वन्य किंवा भटके प्राणी कचराकुंडी शोधत जातात, हे अनेकांनी पाहिलेय; पण सोनगाव कचरा डेपोमध्ये पाळीव गायी चरायला जातात. शहराची घाण येऊन पडणाºया या डेपोत चरताना या गायींच्या पोटात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या जात आहेत. शस्त्रक्रियेद्वारे या पिशव्या बाहेर काढण्याची वेळ मालकांवर आली आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी सातारा शहरात मात्र विक्रेते व नागरिकांकडून या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.सातारा शहरातील विविध भागांतून गोळा करण्यात आलेला कचरा सोनगाव येथील डेपोत घंटागाडीच्या माध्यमातून आणला जातो. शहरात अद्यापही ओला आणि सुका कचरा वर्गीकरण नसल्यामुळे ज्विक कचरा सोडला तर अन्य सर्व प्रकारचा कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून टाकला जातो. डेपोमध्ये उघड्यावर पडलेल्या या कचºयाच्या ढिगावर चढून त्यातून अन्न शोधण्याचा प्रयत्न या गायी करतात. ज्या पिशवीत अन्न आहे, त्या पिशवीची गाठ सोडवणं किंवा त्यातून अन्न बाहेर काढणं या दोन्ही गोष्टी तिला करणं अशक्य आहे. त्यामुळे पिशवीसह अन्न तिच्या पोटात जाते. कालांतराने अन्न पचते मात्र प्लास्टिकचे जिन्नस आतड्यांमध्ये गाठीच्या स्वरुपात साठून राहतात. गायीच्या पोटात दुखू लागल्यानंतर सोनोग्राफीमध्ये ही बाब निदर्शनास येत असल्याने गायी मालकही अवाक होत आहेत. कित्येकदा प्लास्टिकचे छोटे डबे, कंगवा, साबण ठेवायचे भांडे आदी अनेक प्लास्टिकच्या वस्तू गायीच्या पोटातून पशुवैद्यकीय तज्ज्ञ काढतात. गायीच्या पोटातील हे प्लास्टिक वेळेत काढले नाही तर गायींसाठी प्राणघातक ठरू शकते.सोनगाव कचरा डेपोत सर्वाधिक प्लास्टिकच्या कचºयाचा खच असतो. प्लास्टिकच्या पिशवीसह, बाटल्यांचा मोठा साठा येथे भंगार गोळा करायला येणाºया महिलांना मिळतो. एकरांमध्ये विस्तारलेल्या या डेपोत दिवसाकाठी पन्नासहून अधिक गायी चरायला म्हणून येतात.कचºयाला प्लास्टिक पिशवीच का?साताºयात निसर्ग संपन्नता असली तरीही गेल्या काही वर्षांत येथे सिमेंटचे जंगल भलतेच वाढले आहे. वाढत्या अपार्टमेंटमुळे महिलांना ओला आणि सुका कचरा एकत्रच टाकण्याची सवय लागली आहे. खरकटं अन्न, चहा पावडरचा चोथा, स्वयंपाकघरातील टाकाऊ भाज्या घरातून बाहेर टाकायच्या असतील तर त्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या जातात. सकाळी घंटागाडी आली की पिशवी थेट कचरा डेपोत पोहोचते. घरात असलेल्या डस्टबीनमध्ये हा ओला कचरा टाकला तर त्यावर चिलटे, माशा बसण्याचा धोका असतो. त्याबरोबरच खराब झालेले डस्टबीन धुण्याचा व्यापही वाढतो. हा त्रास कमी करण्यासाठी सर्व घाण एकाच प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्याचा पर्याय महिला निवडतात; पण त्यांच्या या पर्यायाचा गायींना कचरा डेपोवर त्रास होतो.काय काय दिसतेयकचरा डेपोत...!घरातील नको असलेली प्रत्येक गोष्ट या डेपोत ऐटीत राहते. खराब आणि फाटलेल्या कुजलेल्या गाद्या, प्लास्टिकच्या चटई, गंजलेली भांडी, तुटका आरसा, निरूपयोगी भांडी, घरातील घाण, लहान मुलांचे नॅपकीन, बाद सुरी, अभ्यासाची जुनी पुस्तके, तुटलेली खेळणी, मोडलेल्या सायकली, जुन्या फ्रेम याबरोबरच नासलेलं आणि खरकटं अन्न.