मसूर : ‘ग्रामपंचायतीच्या कामाचा अभ्यास असणारे पैलवान सतीश इंगवले पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करतील व परिषदेस एका वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्वास कोयना दूध संघ कऱ्हाडचे माजी चेअरमन संपतराव इंगवले यांनी व्यक्त केला.
रिसवडचे माजी सरपंच सतीश इंगवले यांची पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सतीश इंगवले म्हणाले, ‘परिषदेमध्ये काम करताना सर्वांनी माझ्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन एक चांगले काम करून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेन.’
रमेश इंगवले यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग इंगवले यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाम जामोदेकर, उत्तम इंगवले, दादा इंगवले, सोमनाथ गुरव, तानाजी इंगवले, दत्तात्रय माळी, पांडुरंग झंजे, जगन्नाथ मोहिते, विठ्ठल इंगवले, सदाशिव इंगवले, हणमंत इंगवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ११मसूर
रिसवड येथे पैलवान सतीश इंगवले यांचा सत्कार करताना संपतराव इंगवले, शाम जामोदेकर, उत्तम इंगवले आदी उपस्थित होते.