भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला धक्के देण्याची सवय असल्याचं म्हटलं. "कधी कधी मी हे धक्के देतो आणि कधी हे धक्के मलाही बसतात," असं ते आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. "मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वत:ला बसतो. 'आदत से मजबूर' म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही. मी आजवर समाजकारण केलं. तेही लोकांचं हित नजरेसमोर ठेवून केलं. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे," असं उदयनराजे म्हणाले. यावेळी त्यांना हा रस्ता सर्वसामान्यांसाठी कधी खुला केला जाणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी हिंदी चित्रपटातील एक डायलॉग मारत 'अभी के अभी' असं म्हटलं. खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनादरम्यानही आपली कॉलर उडवली होती. यासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "इतरांची जशी एक स्टाईल असते तशी आपलीही आहे. आपल्याला कोणी शाबासकी देवो अगर नको. स्वत:ला शाबासकी देण्याचा अधिकार मलाही आहे आणि ती आपली पद्धत आहे," असं उदयनराजे म्हणाले. आजपासून ग्रेड सेपरेटरचा मार्ग सर्वांसाठी खुला होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले
By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 14:57 IST
इतरांची जशी स्टाईल असते तशी आपलीही आहे, असं कॉलर उडवण्याच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले.
मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले
ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांनी अचानक केलं ग्रेड सेपरेटरचं उद्धाटनकधी राजकारण केलं नाही, लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून समाजकारण केलं, उदनराजेंचं वक्तव्य