शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची हुडहुडी जाईना...पारा १० अंशावर : महाबळेश्वरातही थंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:36 IST

Mahabaleshwar Hill Station Satara WinterNews- सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजुनही जाता जाईना. तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देसातारकरांची हुडहुडी जाईना...पारा १० अंशावर महाबळेश्वरातही थंडी कायम

सातारा : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजुनही जाता जाईना. तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.जिल्ह्यात मागील महिन्यापासून थंडीला सुरूवात झाली. मात्र, यावर्षी किमान तापमानात सतत चढ-उतार होत आला आहे. कधी किमान तापमान १५ अंशाच्या खाली येते. तर काहीवेळा २० अंशावरही पोहोचते. त्यातच ढगाळ वातावरणाचाही अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे सातारकरांना विविध हवामानाशी सामना करावा लागत आहे.काही दिवसांपूर्वी तर साताऱ्याचे किमान तापमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हळू-हळू तापमानात उतार आला. आता तर साताºयातील किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आलेले आहे. २० डिसेंबर रोजी साताऱ्यात १४.०८ अंश तापमानाची नोंद झालेली. तर सोमवारी १२.०१ अंश तापमान नोंदले गेले.

यावर्षातील साताऱ्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले होते. मात्र, मंगळवार दोन वर्षांतील नीच्चांकी तापमान ठरले. कारण, साताऱ्यातील किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे हुडहुडी भरुन राहिली. मात्र, बुधवारी तापमानात काहीशी वाढ झाली. १०.०१ अंशाची नोंद झाली. तरीही थंडी कायम आहे.महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर कायम आहे. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरात आलेले पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरमध्ये मंगळवारी ११.०३ अंशाची नोंद झाली.तर बुधवारी किमान तापमान १२ अंशावर गेले होते.दरम्यान, किमान तापमान कमी झाल्याने थंडीने जोर धरला आहे. यामुळे बाजारपेठेसह शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. तर ग्रामीण भागात विजेचे भारनियमन आहे. त्यामुळे वीज उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना रात्रीच्या थंडीतही पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे.सातारा शहरातील किमान तापमान...दि. १४ डिसेंबर १९.०७, दि. १५ डिसेंबर १७.०२, दि. १६ डिसेंबर १६.०४, दि. १७ डिसेंबर १६.०९, दि. १८ डिसेंबर १५.०३, दि. १९ डिसेंबर १६.०३, दि. २० डिसेंबर १४.०८, २१ डिसेंबर १२.०१, दि. २२ डिसेंबर ९ आणि २३ डिसेंबर १०.०१.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर