सातारा : विधान परिषदेच्या सभापतिपदी साताऱ्याचे माजी पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचीच वर्णी लागणार, असा ठाम विश्वास जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून रामराजेंकडे पाहिले जाते. कृष्णा खोरेचे मंत्रिपद, पालकमंत्री, त्यानंतर नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली होती. पालकमंत्री गेल्यानंतरही रामराजेंनी कधी वरिष्ठाबद्दल वक्तव्य केले नव्हते. सभापतींवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यापासून रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या निवडीला त्यांच्याच पक्षातील खासदार उदयनराजे भोसले यांनी कडाडून विरोध केल्यामुळे मंगळवारी होणार असलेल्या घोषणेकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सातारकरांचे लक्ष
By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST