सातारा : देशाभिमानासाठी साताऱ्यातील ३५ हून अधिक नागरिक प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर धावणार तसेच सायकलिंग करणार आहेत. यामध्ये नोकरदार, डॉक्टर आणि व्यावसायिकांचाही समावेश असणार आहे.
‘इंडिया प्राईड अल्ट्रा रन राईड’ अंतर्गत साताऱ्यातील नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. मागीलवर्षी या राईडची सुरुवात झाली. यावर्षी ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे ७२ किलोमीटर रनिंग आणि सायकलिंगचे आयोजन करण्यात आले आहे.२५ रोजी रात्री आठ वाजता ७२ किलोमीटर धावण्यास सुुरुवात होणार आहे. पोवई नाका येथून सुरुवात होईल. त्यानंतर राजवाडा, मंगळवार तळे, पुन्हा राजवाडा, पोलीस मुख्यालयमार्ग पोवई नाका असा मार्ग राहणार आहे. हे पाच किलोमीटरचे अंतर असून ऐकूण १४ फेऱ्या मारण्यात येणार आहेत. २६ रोजी सकाळी धावणे थांबणार आहे. तर सायकलिंगला २६ रोजी पहाटे चारला पोवई नाक्यावरुन सुरूवात होईल. राजवाडा, मंगळवार तळे परत पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका ते मिनाक्षी हाॅस्पिटल तेथून पुन्हा पोवई नाका असा साडे नऊ किलोमीटरचा मार्ग असेल. अशा सात फेऱ्या मारण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत सायकलिंग संपणार आहे.
या इंडिया प्राइड अल्ट्रा रन राईडमध्ये नवनाथ डिगे, सुभाष भोसले, सुनील पानसे, सुधीर पवार, रवींद्र जानकर, शैलेश शिंदे, तानाजी वगरे, राहुल शिंदे, नितीन कोलगे, अजय धुमाळ, किरण गेंजगे, एकनाथ धनवडे, विनय रावखंडे, पंकज नागोरी आदी सहभागी होणार आहेत.
.........................................................................