शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनी अनुभवला खेळ सावलीचा झिरो शॅडो डे : निसर्गाचा अद्भूत चमत्कार पाहून अनेकजण भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:15 IST

सातारा : सावली मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, असं खरंच घडू शकतं, याचा अनुभव गुरुवारी (दि. १०) सातारकरांना आला.

सातारा : सावली मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, असं खरंच घडू शकतं, याचा अनुभव गुरुवारी (दि. १०) सातारकरांना आला. दुपारी बारनंतर काही काळ सावली गायब झाल्याने सातारकरांनी पाहिले. ‘शून्य सावली दिनानिमित्त’ निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पाहून अनेकांनी कुतूहल व्यक्त केले.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य

बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. यालाच ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते.

आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबर आपल्या पायांच्या किंवा त्या वस्तूच्या खाली लपते आणि त्यामुळे ती दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून सातारकरांना या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर गुरुवारी आबालवृद्धांची निसर्गाच्या या अविष्काराचा अनुभव घेतला. सातारा

शहरात गुरुवारी दुपारी बारानंतर नागरिक घराबाहेर पडले. यावेळी अनेकांनी कुतूहलाने आपली सावली शून्य झाली आहे की नाही, याचा अनुभव घेतला. काही दुकानदार व व्यावसायिकांनीही हा प्रयोग करून पाहिला. अनेकांना आपली सावली केवळ पायाखाली आल्याचे दिसले. या दिवसाची आठवण म्हणून युवक-युवतींनी सावली शून्य झाल्याचे फोटोही कॅमेऱ्यात कैद केले. सातारा शहरासह ग्रामीण भागातही अनेकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला.वर्षातून एक दिवस सावली सोडते साथवर्षातून एक दिवस काही वेळासाठी का होईना सावली साथ सोडत असते. संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शून्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. हा सावलीचा खेळ म्हणजे एक खगोलीय चमत्कार आहे. असे दरवर्षीच घडत असते.आपलीच सावली गायब होते, म्हणजे नक्की काय होते? याची काही दिवसांपासून उत्सुकता लागली होती. याचा अनुुभव आज प्रत्यक्षात आला. दुपारी बारानंतर जेव्हा उन्हात उभे राहिलो तेव्हा आपली सावली केवळ पायाखालीच पडल्याचे दिसले. निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल.- प्रमोद जाधव, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNatural Calamityनैसर्गिक आपत्ती