शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

साताऱ्याच्या ‘समाजकल्याण’ला पुण्याचा टेकू ! : दहा वर्षांत ११ जणांकडे प्रभारी कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:14 IST

नितीन काळेल। सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर ...

ठळक मुद्देप्रशासनाचा अजब कारभार; एकालाच तीन वर्षे पूर्ण करता आली

नितीन काळेल।सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर पुण्याच्या अधिकाºयाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारीही पुण्यातील काम पाहून आठवड्यातून काही दिवस येतात. परिणामी दूरवरून येणाºया लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दहा वर्षांत फक्त एकाच अधिकाºयाला तीन वर्षे पूर्ण करता आली असून, तब्बल ११ जणांकडे प्रभारीचा चार्ज होता, हे विशेष.

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागाच्या वतीने अनूसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. याचा लाभ गरजूपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते, त्यासाठी कार्यालयातील यंत्रणा काम करते. समाजकल्याण अधिकाºयाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचे कामकाज चालते.

त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला स्वतंत्र एक अधिकारी आहे; पण गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्हा परिषदेच्या या कार्यालयाला पूर्णवेळ व कायमस्वरुपी अधिकारी फार कमी वेळा मिळाल्याचे दिसून आले आहे. वारंवार प्रभारी अधिकाºयाकडे पद्भार देण्यात आला आहे. आता तर पुणे येथील सहायक आयुक्त कार्यालयातील समाजकल्याण अधिकारी हरीश डोंगरे यांच्याकडे साताºयाचा प्रभारी पद्भार आहे.

नवीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी दर सोमवारी साताºयाच्या कार्यालयात येतात. दिवसभर कामे करतात. तसेच मंगळवारी ते थांबून असतात; पण पुण्याचा कार्यभारही त्यांच्याकडे असल्याने त्यांना तिकडेही जावे लागते. त्यामुळे दोन्हीकडील पद्भार पाहताना तारेवरची कसरत होत आहे. अनेकवेळा जिल्ह्याच्या दूरवरच्या भागातून ग्रामस्थ कामानिमित्त जिल्हा परिषदेत येतात. त्यांना अधिकाºयांना भेटायचे असते. समस्या सांगायच्या असतात; पण येथे आल्यावर अधिकाºयाची भेट नाही झाली तर हेलपाटा मारावा लागतो, त्यासाठी वेळ आणि पैसाही वाया जातो. मोबाईलवरून अधिकाºयाशी संपर्क होतो; पण कामाच्या निपटाºयाचे काय? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे कायमस्वरुपी अधिकारी असणे आवश्यक ठरले आहे.कांबळे तीन वर्षे अधिकारी...समाजकल्याण विभागाचा गेल्या दहा वर्षांचा विचार करता तब्बल ११ जणांकडे प्रभारी पद्भार राहिला आहे. तर ए. पी. कांबळे यांनी पूर्ण तीन वर्षे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच पी. एस. कवटे यांनी दहा महिने, यू. एम. घुले यांनी ६ महिने, स्वाती इथापे यांनी सव्वादोन वर्षे तर ए. एस. बन्ने यांनी ३ आणि ७ महिने असे दोनवेळा पूर्णवेळ कारभार पाहिला आहे. 

साताºयातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात दर सोमवारी हजर असतो. जिल्ह्यातील कोणतेही काम पाठीमागे राहणार नाही, याची काळजी घेण्यात येते. आठवड्यातून चार दिवसतरी साताºयात येण्याचा प्रयत्न असतो. शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत असून, १०० टक्के न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.- हरीश डोंगरे,प्रभारी समाज कल्याण अधिकारी (सातारा)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार