शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांच्या गर्भधारणेविषयी बडबडणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात साताऱ्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:05 IST

शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही संबंधित अधिकारी सत्यजित बडे यांना तत्काळ सूचना देऊ, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देशिक्षिकांच्या गर्भधारणेविषयी बडबडणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात साताऱ्यात संतापशिक्षिकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

सातारा : शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही संबंधित अधिकारी सत्यजित बडे यांना तत्काळ सूचना देऊ, असे आश्वासन दिले.

दोन दिवसांपूर्वी बदलीसंदर्भात जिल्ह्यातील काही शिक्षक सत्यजित बडे यांना भेटले होते. त्यावेळी शिक्षिकांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सांगताच ते म्हणाले, शिक्षिकांच्या बदल्या, त्यांचे दुर्गम भागात जाणे, विस्थापित होणे याबरोबरच त्यांची गर्भधारणाही आम्हीच तपासू का?

 बडे यांच्या या विधानावर उपस्थित शिक्षक अवाक् झाले. शिक्षकांनी आता शिक्षकांची नोकरी सोडून पत्रक लिहिणं, पत्रकारांना बातम्या पुरवणं अन् नेतेगिरी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

जिल्हाधिकारी सिंघल यांच्याशी बोलातना शिक्षिका म्हणाल्या, शिक्षकांवर पातळी सोडून बोलणारे बडे यांचा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार न करता त्यांची अन्यायग्रस्त बदलीबाबत कसलीच जबाबदारी न घेणाऱ्या या अधिकाऱ्याने शिक्षक आणि शिक्षिका यांच्याबाबत केलेले विधान लज्जास्पद आहे. बदली प्रक्रियेमुळे आमचे आयुष्य हादरून गेले असताना अत्यंत असंवेदनशीलपणे वक्तव्य करणं त्या पदाला शोभनीय नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी