शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेत सौरऊर्जेचा लखलखाट, यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:58 IST

सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. यामुळे वर्षाला वीज बिलाचे २५ ते ३० लाख रुपये वाचणार असून, साताऱ्याची मान राज्यात उंचावली आहे. आता उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होणार आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हा परिषदेत सौरऊर्जेचा लखलखाट, यंत्रणा कार्यान्वितराज्यात मान उंचावली; वर्षाला ३० लाखांची बचत; लवकरच उद्घाटन

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. यामुळे वर्षाला वीज बिलाचे २५ ते ३० लाख रुपये वाचणार असून, साताऱ्याची मान राज्यात उंचावली आहे. आता उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. तर अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी साताऱ्याने स्वच्छतेत देशात डंका वाजवला होता. सतत नवनवीन उपक्रम राबविणे, अभियान यशस्वी करणे यामध्ये जिल्हा परिषद आघाडीवर आहे. आतातर जिल्हा परिषदेत सौरऊर्जेचा लखलखाट पसरलाय.जिल्हा परिषदेत विविध विभाग आहेत. परिसरही मोठा आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेला दर महिन्याला सुमारे दोन ते अडीच लाख रुपये तर वर्षाला २५ ते ३० लाख रुपये हे वीज बिलासाठी खर्च करावे लागत होते.

याचा विचार करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यादृष्टीने पावले पडू लागली. या प्रयत्नातूनच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी सुमारे ४७ लाख रुपयांची तरतूद झाली होती.गेल्या साडेचार महिन्यांपासून जिल्हा परिषद इमारतीच्या टेरेसवर सोलर युनिट उभारण्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. मेडा विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले. उभारण्यात आलेले हे युनिट १०० केव्हीचे आहे.

दररोज त्यामधून १०० केव्ही वीज तयार होणार आहे. त्यातून पूर्ण जिल्हा परिषदेत वीज मिळू शकते. तर सध्या जिल्हा परिषदेला दर दिवसाला ९० केव्हीपर्यंत वीज लागते. याचा विचार करता सूर्यप्रकाशापासून तयारी होणारी वीज काही प्रमाणात शिल्लक राहणार आहे. ती विकताही येऊ शकते.वीज कंपनीने उर्वरित राहिलेले काम पूर्ण केले असून, सर्व तपासण्याही पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे मंगळवारपासून प्रत्यक्षात सौरऊर्जेचा वापर जिल्हा परिषदेत सुरू झालाय. या सौरऊर्जेवर सर्व विभाग उजळून निघालेत. यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय, हे निश्चित.जनरेशन, नेट मीटरचे टेस्टिंग...जिल्हा परिषदेच्या टेरेसवर सौरऊर्जा युनिटचे पॅनेल उभारण्यात आले आहे. त्यानंतर जनरेशन आणि नेट मीटरचे टेस्टिंग वीज कंपनीच्या वतीने करण्यात आले. सर्व तपासण्या झाल्यानंतर सौरऊर्जेचा लखलखाट सुरू झाला. 

सातारा जिल्हा परिषदेने सौरऊर्जा निर्माण केली असून, आता यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालीय. वर्षाला वीजबिलापोटी लाखो रुपये जात होते. ते आता वाचणार आहेत. लवकरच उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.- संजीवराजे नाईक-निंबाळकर,अध्यक्ष जिल्हा परिषद

आपल्याकडे अपारंपरिक घटकातून वीज मिळविण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने सूर्यप्रकाशावर वीज तयार करण्याचा निर्णय घेतला. सौरऊर्जा युनिट उभारणी पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात वीजपुरवठाही सुरू झालाय. यामुळे जिल्हा परिषदेचे दरवर्षी ३० लाख रुपये वाचणार आहेत.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर