शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात महिलेचे १९ तोळ्याचे दागिने हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:48 IST

नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली.

ठळक मुद्देसाताऱ्यात महिलेचे १९ तोळ्याचे दागिने हिसकावलेपारंगे चौकातील घटना : दुचाकीवरील चोरट्याचे कृत्य

सातारा : नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माया विलास लादे (वय ५३,रा. सध्या रा. कांदिवली, मुंबई, मूळ रा. सासपडे, ता. सातारा) या रविवारी रात्री नातेवाईकांसमवेत मुंबईला निघाल्या होत्या. मुंबईला जाण्यासाठी पारंगे चौकामध्ये लक्झरी बस उभ्या असतात. या लक्झरी बसकडे त्या चालत जात असतानाच पाठीमागून दुचाकीवरून एक युवक भरधाव आला. काही कळायचा आतच त्याने लादे यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स हिसकावून पलायन केले.त्यांच्या पर्समध्ये १९ तोळ्यांचे दागिने आणि ३१ हजार ५०० रुपयांची रोकड असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज होता. लादे यांनी या प्रकारानंतर आरडाओरड केली. मात्र, संबंधित चोरटा सूसाट पळून गेला. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे पारंगे चौकामध्ये मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने दागिन्यांची पर्स हिसकावून नेली. काही नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची नाकाबंदी केली. तसेच वायरलेसवरून शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले. रात्री अकरापर्यंत पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू होती. मात्र, दागिने हिसकावून पळालेला चोरटा अखेर सापडलाच नाही. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर