शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वाऱ्याशी स्पर्धा १८ मजुरांचा जीव घेऊन गेली, पोलीस तपासात निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:58 IST

विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले.

ठळक मुद्देवाऱ्याशी स्पर्धा १८ मजुरांचा जीव घेऊन गेली, पोलीस तपासात निष्पन्न मुलगा टेम्पो सावकाश चालवतो म्हणून महिबूब आतारकडून ताबा

शिरवळ : विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले.दरम्यान, टेम्पोमालक महिबूब आतार याचा मुलगा माजीद हा प्रथम वाहन चालवत होता; पण तो सावकाश चालवत असल्याने टेम्पोचा ताबा महिबूबने घेतला आणि वाऱ्याशी स्पर्धा निष्पापांची बळी घेऊन गेली, असं पोलीस तपासात पुढे आले आहे.कर्नाटक राज्यातील विजापूरजवळील विविध गावांतील सेंट्रिग काम करणाऱ्या ३७ मजुरांना घेऊन मुकादम विठ्ठल राठोड हे पुणे जिल्ह्यातील भोरजवळ असणाऱ्या एका गावात निघाले होते. यासाठी विजापूर येथील महिबूब आतार याच्या मालकीच्या टेम्पोमधून व दोन दुचाकीवरून विठ्ठल राठोड हे स्वत: भोरच्या दिशेने सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येत होते. निघताना टेम्पो महिबूब आतार याचा मुलगा माजीद हा चालवित होता.महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर कऱ्हाडलगत एका हॉटेलवर जेवण केल्यानंतर माजीद हा सेंट्रिगच्या भरमसाठ साहित्यामुळे टेम्पो सावकाशपणे चालवित होता. माजीद व वडील टेम्पोमालक महिबूब आतार यांच्यामध्ये टेम्पो चालविण्यावरून शाब्दिक चकमक उडाली.

महिबूब आतार याच्या म्हणण्यानुसार माजीद हा सावकाशपणे टेम्पो चालवित असल्यामुळे संबंधित मजुरांना सोडण्यासाठी उशीर होणार होता. कारण दुसऱ्या दिवशीच्या भाड्याला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने टेम्पो वेगात चालविण्यास सांगत होता. मात्र, चालक असलेला माजीद हा सकाळपर्यंत सावधपणे जाऊ असे म्हणत होता.

यावेळी महिबूब आतार व माजीद यांच्यामध्ये टेम्पो चालविण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर माजीदने माघार घेत तो टेम्पोमध्ये झोपण्यासाठी गेला. यावेळी महिबूब आतार हा टेम्पो चालवू लागला.

यावेळी दुचाकीवरून येत असलेले मुकादम विठ्ठल राठोड हे थंडी वाजत असल्याने दुचाकीवरून टेम्पोत आले व एका मजुराला दुचाकीवर बसविले. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार महिबूब आतार हा टेम्पो चालविताना हवेशी स्पर्धा करू लागला होता.दरम्यान, महामार्गावर वाई तालुक्यातील वेळेजवळ चहा घेतल्यानंतर लवकर पोहोचण्यासाठी महिबूब आतारने वाहन भरधाव वेगात घेतले. आशियाई महामार्गावरील मृत्यूचे दार असलेल्या खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवर टेम्पो आला असता नियंत्रण सुटले. त्यामध्येच निष्पाप १८ जणांना चालकाच्या लवकर पोहोचण्याच्या अतिघाईमुळे जीवाला मुकावे लागले.

गंभीर जखमी झालेल्या १९ जणांपैकी दोघांना अंपगत्व येत मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. त्यामुळे घटनास्थळी वेळपूर्वी पोहोचण्यासाठी टेम्पोचालकाने केलेली हवेशी स्पर्धा निष्पाप जीवांच्या जीवावर बेतली, अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात