शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

Satara: सातारा बाजार समितीमध्ये शिट्टी वाजली, अजिंक्य पॅनलची सत्ता कायम

By दीपक देशमुख | Updated: May 1, 2023 15:48 IST

Satara News: सातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ सर्व  १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

सातारा:  सातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ सर्व  १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची जोरदार उधळण करत जल्लोष केला.

सातारा बाजार समितीच्या १८ जागांसाठी दि. ३० एप्रिल रोजी मतदान झाले होते तर १ मे रोजी निकाल होता. त्यानूसार जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंध शंकर पाटील यांच्या अधिपत्याखाली दहा टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला सर्व मतदार संघातील मतपत्रिका वेगळ्या करण्यात आल्या. त्यानंतर सर्व मतदार संघातील मतमोजणी एकच वेळी हाती घेण्यात आली. 

निकाल ऐकण्यासाठी दोन्हीं पॅनलच्या उमेदवार तसेच समर्थकांची मतमोजणी केंद्राच्या आवारात गर्दी झाली होती. व्यापारी मतदार संघातून हमाल मापाडी मतदार संघातून अमिन शकुर कच्छी व बाळासाहेब यशवंत घोरपडे निवडून येताच अजिंक्य पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यानंतर सोसायटी मतदार संघातील  आणि ग्रामपंचायत मतदार संघातील जागांचा निकाल लागला. सर्व १८ जागांवर अजिंक्य पॅनेलने मोठ्या मतांनी दणदणीत विजय मिळवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलने खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीची घेतलेली मदत निष्फळ ठरली. स्वाभिमानीला भोपळाही पडता आला नाही. 

अजिंक्य पॅनेलचे विजयी उमेदवार

सोसायटी मतदारसंघसर्वसाधारणरमेश विठ्ठल चव्हाण १२५६ धनाजी जाधव १२२४ राजेंद्र महादेव नलावडे १२५४ मधुकर परशुराम पवार १३०४विक्रम लालासो पवार १२७८विजय उत्तम पोतेकर १२८९भिकू भाऊ भोसले १२६२ 

महिला प्रतिनिधीवंदना किशोर कणसे १३३८आशा मंगलदास गायकवाड १३०४

इतर मागास प्रवर्गइसुब शमशुद्दीन पटेल १२९७

वि.जा.भ.ज.दत्तात्रय लक्ष्मण कोकरे १३१४

ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारणआनंदराव कल्याणराव कणसे ११३९अरुण बाजीराव कापसे ११००

अनुसुचित जाती / जमातीशैलेंद्र राजाराम आवळे ११०९ 

आर्थिक दुर्बल घटक संजय ज्ञानदेव पवार ११०३

व्यापारी आडते मतदार संघअमिन शकुर कच्छी  (फजलानी) ६३३बाळासाहेब यशवंत घोरपडे ६६८

 हमाल मापाडी अनिल बळवंत जाधव ३९

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेElectionनिवडणूक