शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

सातारी वेबसाईटला वेध एक कोटी मराठ्यांचे !

By admin | Updated: September 24, 2016 00:22 IST

संपूर्ण देशातून नोंदणी सुरु : ४७ लाख बांधवांनी दिली व्हिजीट; १ लाख १५ हजार झाले सदस्य

सातारा : साताऱ्यातील दोन मराठा तरुणांनी सुरू केलेल्या ‘एक मराठा’ वेबसाईटला तब्बल एक कोटी मराठा बांधवांच्या नोंदणीचे वेध लागले असून, हा आकडा गाठला तर हायटेक टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महाविक्रम ठरेल. अवघ्या ९ दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ँ३३स्र://६६६.1ें१ं३ँं. ूङ्मे या संकेतस्थळावर तब्बल ४७ लाख मराठा लोकांनी ‘व्हिजीट’ दिली आहे. तर १ लाख १५ हजार मराठा लोकांनी आपली नोंद केली आहे. यामध्ये व्यावसायिक, नोकरदार तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा सहभाग आहे. ही वेबसाईट साताऱ्यामधून मराठा महामोर्चा समितीच्या सहकार्याने तयार केली आहे. या वेबसाईटचा उद्देश सातारा मराठा महामोर्चाबद्दल माहिती, जिल्हानिहाय माहिती लोकांना पोहोचवणे हा आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यांचे मार्ग या वेबसाईटवर देण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविलेल्या अफवांवरही आळा बसला. आजकाल ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर चुकीचे मेसेज देऊन मराठा बांधवांना चुकीचे मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी आपण सर्वांना खरी व बरोबर माहिती मिळावी व ती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी आपण ही संकल्पना राबविली आहे. तसेच आपण ही माहिती जिल्हानिहाय सातारा मराठा महामोर्चा कमिटीकडे देण्यात येत आहे. जेणेकरून ते सर्व समाजाला मेसेजद्वारे माहिती देऊ शकतील. तसेच महामोर्चानंतरची सुद्धा भूमिका किंवा माहिती मराठा समाजापर्यंत वेळोवेळी पोहोचवणे शक्य होत आहे. अफवांना बळी न पडता आपली माहिती वेबसाईटवर अपडेट करावी व सातारा मराठा महामोर्चामध्ये सहभागी व्हावे, अशी माहिती वेबसाईट बनविणारे साताऱ्याचे नवनाथ देशमुख, गजानन गोरे, अभिजित निकम, सतीश डोके यांनी दिली. (प्रतिनिधी) कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही या वेबसाईटचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, संघटनेशी संबंध नाही. तसेच हा मेसेज आपल्या जास्तीत जास्त मराठा बांधावांपर्यंत पोहोचवा म्हणजे महामोर्चानंतरची सुद्धा माहिती तुम्हाला एकाच जागेवर बघता येईल. तसेच आम्ही जिल्हानिहाय मराठा स्वयंसेवकांची लिस्ट वेबसाईटवर अपलोड करत आहोत, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. वेबसाईटचा यांना फायदा ४मराठा समाजाचे व्यावसायिक वेबसाईटवर नोंदणी करतात ४याच वेबसाईटवर शिक्षण घेत असलेले व शिक्षण पूर्ण झालेल्यांचीही नोंदणी ४व्यावसायिकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, तसेच तरुणांना रोजगार ४माहिती एकमेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोग ४महाराष्ट्रासह बेळगाव, बिहार, हैद्राबाद, गुजरात, दिल्ली या ठिकाणीही नोंदणी सुरू सातारा मराठा महामोर्चाच्या अनुषंगाने चुकीची माहिती पसरवली जाऊ नये, या हेतूने जिल्हास्तरावर सोशल मीडिया कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजची खातरजमा करून योग्य माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचविण्यात येते. - नवनाथ देशमुख