शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या गावात धोम बलकवडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 11:13 IST

डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील दुष्काळाची तीव्रता नाहीशी झाली.

वाठार निंबाळकर : डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील दुष्काळाची तीव्रता नाहीशी झाली.फलटण तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या असणारे मिरडे हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुबलक जमीन असूनही शेतीला पाणी नसल्याने गावातील अनेक ग्रामस्थ शेळ्या-मेंढ्या सांभाळून उदरनिर्वाह करतात.

मात्र, राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे धोम बलकवडी धरणाचे पाणी आज फलटण तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या मिरढे गावात आले आहे. या पाण्याने गावातील पाझर तलाव पूर्ण भरला आहे.गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव काळे म्हणाले, आमच्या गावात आजपर्यंत दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणी टँकर लागत होता. मात्र, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे आज गावात पाणी आल्याने अनेक वर्षात पहिल्यांदाच टँकर सुरू नाही.सरपंच संगीता लोंढे म्हणल्या, अनेक वर्षे जो तलाव पावसाळ्यात ही भरला जात नाही, तो आज उन्हाळ्यात धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. गावातील सर्व वडीलधारी मंडळी ज्यांना आपल्या गावात कधी पाणी येईल, असे वाटत नव्हते. आज ते मात्र, प्रत्यक्षात गावात पाणी आलेलं पाहून आनंदी झाली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी