शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साताऱ्यात युवतीच्या पोटात गोळी घातली, दुचाकीवरून आलेल्या तिघांचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:45 IST

येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका युवतीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला.

सातारा : येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका युवतीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. यामध्ये संबंधित युवतीच्या पोटात गोळी लागली असून, या युवतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.अश्विनी कांबळे (वय २०, रा. बुधवार नाका, सातारा) असे जखमी युवतीचे नाव आहे. याबाबाबत अधिक माहिती अशी की, येथील बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अश्विनी कांबळे ही चालत निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिच्यावर गोळीबार केला. यामध्ये अश्विनी गंभीर जखमी झाली. तिच्या पोटामध्ये उजव्या बाजूला गोळी लागली आहे. काही नागरिकांनी संबंधित युवतीला तत्काळ रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली, त्या पिस्तुलातील पुंगळी घटनास्थळी पोलिसांना सापडली आहे. दरम्यान, अश्विनीवर कोणी व कशासाठी गोळी झाडली? हे अद्याप समोर आले नाही. कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर