शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : यात्रेवरून परतताना वाईजवळ दोन युवक ठार, एक जखमी; दुचाकी-कारची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 12:10 IST

यात्रा करून दुचाकीवरून गावी परताना कारने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात वाई-पाचवड रस्त्यावरील भीमनगर-तिकाटणे येथे शुक्रवार, दि. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. शुभम प्रवीण महिंद्रे, अक्षय रघुनाथ चिकणे असे ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देयात्रेवरून परतताना अपघात; दोन युवक ठार, एक जखमी;वाईजवळ दुचाकी-कारची समोरासमोर धडक

वाई (सातारा) : यात्रा करून दुचाकीवरून गावी परताना कारने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात वाई-पाचवड रस्त्यावरील भीमनगर-तिकाटणे येथे शुक्रवार, दि. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. शुभम प्रवीण महिंद्रे, अक्षय रघुनाथ चिकणे असे ठार झालेल्यांची नावे आहेत.वाई पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शुभम प्रवीण महिंद्रे (वय २१), अक्षय रघुनाथ चिकणे (२२, रा. नावेचीवाडी, वाई) व पंकज सुनील चव्हाण (रा़ सारंग सोसायटी, वाई) हे तिघेजण शुक्रवार, दि़ २० रोजी कळंभे येथे यात्रेसाठी दुचाकीवरून (एमएच ११ सीएफ ३२५२) गेले होते़.यात्रेवरून माघारी येताना वाई-पाचवड रोडवर रात्री पावणेअकराच्या सुमारास ते तिकाटणे येथे आले. त्यावेळी वाईहून पाचवडच्या दिशेने निघालेली कार (एमएच ०५ एजी ६८३८) आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली.

यामध्ये शुभम महिंद्रे हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना वाई येथील खासगी दवाखान्यात दाखल केले़ दरम्यान, उपचार सुरू असताना अक्षय चिकणेचा मृत्यू झाला़ अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात