शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:14 IST

सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

ठळक मुद्देवर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सातारा : सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.सातारा-वाई मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील धोकादायक वळण सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. आधीच पूल त्यात धोकादायक वळण असल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनांच्या वेगावरही नियंत्रण नसते.खंडाळ्यातील एस वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अनेकजण जखमीही झाले आहेत. अशीच काहीशी परिस्थितीत वर्येतील वळणाची झाली आहे. या वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडा-झुडपांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अरुंद रस्ता असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

वर्ये पुलावरील धोकादायक वळण अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आजपर्यंत या वळणावर अनेक अपघात घडले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या मार्गावरील वाहनांची संख्यापाहता, प्रशासनाने रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे.- श्रीरंग काटेकर 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात