शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट, कर्णकर्कश गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:03 IST

फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडले जात आहेत. वळणावर ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत.

ठळक मुद्देट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट कर्णकर्कश आवाजातील गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ

आदर्की : फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडले जात आहेत. वळणावर ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत.आदर्की फाटा-फलटण मार्गावर कोल्हापूर, कऱ्हाड , सातारा, सुरवडी, फलटण, बारामती, पंढरपूर शहर व औद्योगिक वाहतूक या मार्गावरून होते. तर आॅक्टोबर ते जून महिन्याच्या दरम्यान ऊस वाहतूक टॅक्टर ट्रॉली, छकडा (मुंगळा) मधून होते. शेणखताचीही वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरचालक कर्णकर्कश आवाजात गाणी लावून असतात. जादा ऊस भरण्याची स्पर्धा चालकांमध्ये सुरू असते. त्यातूनच या मार्गावर फलटण पूल, हणमंतवाडी घाट, दस्तुरी चढ-उतार, बामण कडा, कापशी, पॉवर हाऊस चढ, नाना घोल उतार, घाडगेवाडी-मिरगावपर्यंत चार ते पाच ठिकाणी चढ-उतार आहेत. वळणावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. नियंत्रण सुटल्यास पुलावरून ट्रॅक्टर पडण्याचे प्रमाण वाढले आहे.वाहतुकीमुळे दुसऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावर दहा ते बारा अरुंद, कठडे तुटलेले पूल आहेत. कारखाना व्यवस्थापन व वाहतूक पोलिसांनी धोकादायकरीत्या वाहतूक करणाºया चालकांना समज देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने