शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून, घंटागाडी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:20 IST

सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून, घंटागाडी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्नकुटुंबीयांचा आरोप; जिल्हा रुणालयात उपचार सुरू

सातारा : सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर शेलार यांनी कर्ज काढून घंटागाडी खरेदी केली आहे. ही घंटागाडी सदर बझार परिसरातील कचरा उचलण्याचे काम करते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही घंटागाडी अचानक बंद करण्यात आली. या पाठीमागे नगरसेवक विशाल जाधव यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला आहे.घंटागाडी अचानक बंद झाल्याने त्यात भाड्याच्या घरात राहून कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न ज्ञानेश्वर शेलार यांच्यापुढे उभा राहिला. त्यामुळे ते गेल्या दोन-तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत होते. त्यातनगरसेवक जाधव हे शेलार यांच्याकडे महिन्याला हप्ता देण्याची मागणी करीत होते, असा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याच कारणातून त्यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची अद्याप शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर