शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सिव्हिलला तीन कोटींचं मशीन येणार, सीटी स्कॅनसाठी रुग्णांना पडत होता आर्थिक भुर्दंड, रुग्णांची ससेहोलपट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:24 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तब्बल तीन कोटींचं सीटी स्कॅनचं मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत असून, मशीन येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे सातारा सिव्हिलला तीन कोटींचं मशीन येणारसीटी स्कॅनसाठी रुग्णांना पडत होता आर्थिक भुर्दंड रुग्णांची ससेहोलपट थांबणार

सातारा : गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तब्बल तीन कोटींचं सीटी स्कॅनचं मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत असून, मशीन येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सीटी स्कॅनचे मशीन होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी या मशीनला राजकीय आजारपणामुळे कऱ्हाडला हलविण्यात आले. तेव्हापासून सिव्हिलमध्ये सीटी स्कॅनचे मशीन नाहीच. रोज कुठे ना कुठे तरी अपघात होत असतातच.

सिव्हिलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचे सीटी स्कॅन करणे गरजेचे असते. सध्या रुग्णालयात मशीन नसल्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यामध्ये जावे लागते. या ठिकाणी चार ते पाच हजार रुपये रुग्णांना मोजावे लागतात. गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे लोकमतने अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. इतर मशीनस् प्रमाणे सीटी स्कॅन मशीन गरजेचे असताना रुग्णालय प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे लोकमतने निदर्शनास आणले होते.

या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी राज्य शासनाकडे सीटी स्कॅनसाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, तीन कोटींचे मशीन लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी सीटी स्कॅनचे मशीन कोठे ठेवायचे, त्याची मापे प्रशासनातील अधिकारी घेऊन गेले आहेत. येत्या काही दिवसांत हे मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल