शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा प्रवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 05:34 IST

Satara: निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. इतरही छोटे-छोटे धबधबे काही दिवसांत प्रवाहित होतील.

-निलेश साळुंखे

 कोयनानगर - निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. इतरही छोटे-छोटे धबधबे काही दिवसांत प्रवाहित होतील. दोन वर्षांपूर्वी भूस्खलन व अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांविना ओस पडलेला कोयना भाग पुन्हा वर्षासहलीने बहरला तर निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील शेकडो लहान-मोठ्या व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भागात जून महिन्याच्या अखेरीस हलक्या, मध्यम सरींसह पावसाचे आगमन झाले आहे. सदाहरित असलेल्या डोंगरकपारीसह परिसरात गर्द हिरवळीचा गालिचावर दाट धुक्याची दुलई अन् पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रांगांमधून पाटणच्या पश्चिमेकडील कुंभार्ली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या जलधारा पावसाळ्यात पर्यटकाना खुणावत असतात. जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण, नेहरू गार्डन व शिवसागर जलाशयाचे छोट्या-छोट्या खोऱ्यांतून विस्तारलेले पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आकर्षण ठरत असून कोयनेच्या वर्षापर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला ओझर्डे धबधबा प्रवाहित झाल्याने हौशी पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत.

ओझर्डे धबधब्याचा उगम असलेला डोंगरमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धबधबाचा प्रवाह काही प्रमाणात सुरू झाला असून तीनपैकी एक मोठी धार कोसळू लागली आहे.

दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनाने ओझर्डे धबधब्याचा परिसर सुशोभित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच बहुतांश भाग वाहून गेला होता. तद्नंतर पर्यटकानी पाठ फिरवली होती व त्याअगोदर दोन वर्षे कोरोनाच्या काळात प्रवेशबंदी असल्याने स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला होता.ओझर्डे धबधबा-उगमस्थान तोरणे गाव- धबधब्याची धार ३०० फूट- समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंची- उगमस्थानापासून धबधबा कोयना धरणात मिसळतो ते अंतर सहा कि.मी. आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात अल्पशा वाढ झाली आहे. सध्या धरणात १०.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. गत २४ तासांत पडलेला पाऊस कोयना ४९. एकूण १४० मिलीमीटर, नवजा ४४/१६० मिलिमीटर, महाबळेश्वर ८७/२०८ मिलिमीटर.फोटो

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटन