शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अठरा फाटा गाव दहा दिवसांपासून अंधारात, विद्युत रोहित्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:51 IST

फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठराफाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संपर्कक्षेत्राबाहेर आहेत.

ठळक मुद्देअठरा फाटा गाव दहा दिवसांपासून अंधारात, विद्युत रोहित्र बंदमोबाईल, टीव्ही बंद पडल्याने ग्रामस्थ संपर्कक्षेत्राबाहेर

जिंती : फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठरा फाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संपर्कक्षेत्राबाहेर आहेत.या ठिकाणी गावातील नागरिकांना वीज वितरण विभागाला लेखी तक्रार दाखल केलेली आहे. सबंधित विभागाने तुमी वीज बिल भरा मग रोहीत्र जोडला जाईल, असे उत्तर देण्यात आले आहे.

या रोहीत्रावर काही शेतपंप आहे. त्याचे बिले थकबाकी आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या ठिकाणी गावातील नागरिकांना सिंगल फेज लाईट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.या काळात गावात कोणीही अभियंता किंवा वायरमन फिरकले नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या रोहीत्राकडे दुर्लक्ष होत असुन गावात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा खंडित झालेले आहे.

दहा दिवसांपासून अठरा फाटा परिसरात रोहित्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापही दुरुस्त केलेला रोहित्र न आल्याने सध्या गाव अंधारात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे .दळणासाठी शेजारच्या गावातया भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. ग्रामस्थांना दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे. ज्यांच्या घरी पुरुष मंडळी नाही, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण