शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सहाशे फूट खोल दरीत कोसळला टेम्पो, पसरणी घाटात अपघात : एक ठार; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:47 IST

वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, अलहाबाद) असे ठार झालेल्या क्लिन्नरचे नाव आहे.

ठळक मुद्देसहाशे फूट खोल दरीत कोसळला टेम्पो, पसरणी घाटात अपघात एक ठार; दोघे जखमी

वाई : वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, अलहाबाद) असे ठार झालेल्या क्लिन्नरचे नाव आहे.याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो (एमएच ०४ एचडी ४६९०) चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन पसरणी घाटातून पाचगणीकडे निघाला होता.

घाटातील बुवासाहेब मंदिराजवळील वळणावर आल्यानंतर चालक रमेश मोतीलाल जसवाल (५८, अलहाबाद, उत्तरप्रदेश) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. यानंतर टेम्पो घाटातीलसंरक्षक कठडा तोडून तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला.

त्यानंतर मोठा आवाजझाला. इतर वाहनचालकांनी तत्काळ आपली वाहने थांबवून दरीत उतरण्यास सुरुवातकेली. जखमींना दरीतून वर काढण्यात आले. या अपघातात क्लिन्नर पप्पू जसवाल हा गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला, तर चालक रमेश जसवाल व पट्टेबहादूर अमृतलाल दिंड दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींवर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टेम्पो दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून, घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात