शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जीवाभावाचा सर्जा-राजा ट्रॅक्टरपुढं दुर्लक्षित, गरीब शेतकऱ्यांकडेच बैलजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:33 IST

खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.

ठळक मुद्देजीवाभावाचा सर्जा-राजा ट्रॅक्टरपुढं दुर्लक्षितगरीब शेतकऱ्यांकडेच बैलजोडी खटाव तालुक्यात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर

खटाव : खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.सध्याचे युग हे धकाधकीचे आहे. झटपट व घाईगडबडीच्या जमान्यात शेतकरीही काही कमी नाही व मागेही नाहीत. झटपट शेती करताना महनत कमी तसेच लवकर निकाल अशा पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकरी यांत्रीक साधनांचा वापर करत आहेत.

पारंपरिक पध्दतीत बैल जोड्यांच्या साह्याने केली जाणारी शेती पध्दतीत बदल झाला. बैल जोड्यांच्या मदतीने केली जायची ती सर्व कामे आता ट्रक्टरच्या सहाय्याने कमी वेळेत होऊ लागली आहेत.अधिक लगबगीने बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा या अवजारांकडे जास्त असताना दिसुन येत आहे. ज्या गोठ्यात पुर्वी बैलजाडी उभी असायची त्याच जागेवर आता ट्रक्टर उभे आहेत. नांगरटी, पेरणी, मळणीपर्यंतची सर्व कामे ट्रक्टर करु लागला.पूर्वीपासून शेतात कोणत्याही पिकाची मळणी शेणाने सारवलेल्या खळ्यात करताना ही मळणी महिनाभर चालायची. यासाठी बैलजोडीची आवश्यकता असते. मनुष्यबळही तितकेच लागत असे. बदलत्या काळानुसार शेतीच्या संकल्पनाही बदलल्या.

आता याच जागावर आधुनिक यंत्रांनी आपला कब्जा केला आहे. मळणी यंत्राणे ही जागा घेतल्याने शेतकऱ्यांनी या खळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता शिवारात सर्जाराजाच्या नावाने ऐकु येणारी हाक कमी होउन मळणी यंत्राच्या आवाजाने ती जागा घेतली आहे. शेतकऱ्यांची सुगी आता एका दिवसात घरी येऊ लागली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी