शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बंद करो..बंद करो..शोषण करना बंद करो, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:14 IST

सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला.

ठळक मुद्देसातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्ह्यातील आठ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घोषणा

सातारा : जिल्ह्यातील विविध विभागांत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला.  बंद करो..बंद करो, शोषण करना..बंद करो, नौकरीयोंपे पडा हातौडा, बेचो चाय तलो पकोडा, सरकारला आमच सांगणं हाय, २०१९ ला निवडणूक हाय, कंत्राटींनी आणलं सरकार, आता कंत्राटीच घालवणार,अशा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.जिल्हास्तरीय शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील हेमंत भोसले, स्वच्छ भारत मिशन विभागातील ऋषीकेश शिलवंत, महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाचे ऋषीकेश जाधव, करण जगताप, शकील मुजावर यांच्यासह प्रमुख कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी शर्तीबाबत तसेच या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक म्हणजे संपूर्ण राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे.

कंत्राटी पध्दतीने विहित प्रक्रिया करून कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून आम्ही शासकीय योजनांची अविरतपणे अंमलबजावणी करीत आहे. निवड झाल्यानंतर सेवेत कायम करण्यात येईल, या भोळ्या आशेवर कर्मचारी आहेत. जिल्ह्यात सर्व विभागांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास ८ हजारांच्या घरात आहे.

या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत शासकीय सेवेत कायम करण्यात आलेले नाही. उलट शासनाने नव्याने परिपत्रक काढले आहे की, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रथमत: ११ महिन्यांसाठी तसेच जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorतहसीलदार