शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळ, महामंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 13:53 IST

शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर एसटीचा दुष्काळमहामंडळाचे दुर्लक्ष खासगी वाहतुकीचा वापर करण्याची प्रवाशांवर वेळ

मायणी (सातारा) : शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.सातारा औंध मायणी, दिघंची, महूद, पंढरपूर या मार्गाची शिवकालीन मार्ग म्हणून ओळख आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणूनही याकडे पाहिले जात होते.

मल्हारपेठ-पाटण-उंब्रज-मसूर-मायणी-झरे-महूद-पंढरपूर हा राज्यमार्ग आहे. हे दोन्ही मार्ग सातारा, कऱ्हाड , खटाव, कोरेगाव, पाटण या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांतून जातो.या दोन्ही मार्गांवर मायणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणावरून सातारा ७९, मल्हारपेठ ६५, पंढरपूर ९४ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सातारा वगळता दिवसभर मायणी गावातून मल्हारपेठ, कऱ्हाड , पाटण, मसूर, पंढरपूरकडे जाण्यासाठी एकही बस नाही.

त्यामुळे प्रवाशांना विटा, कऱ्हाडमार्गे पाटण, मल्हारपेठला जावे लागते. पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा, खानापूर किंवा म्हसवडमार्गे जावे लागते.आषाढी, कार्तिक या मोठ्या एकादशीसह महिन्यात येणाऱ्या एकादशींना पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या मार्गावर एसटी बस नसल्याने या भक्तांना अन्य मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो.

या मार्गाशी संबंधित कऱ्हाड , पाटण, कोरेगाव, सातारा, पंढरपूर व खटाव तालुक्यांतील वडूज आगारांना एसटी बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. मात्र त्याकडे सर्व आगारप्रमुखांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडसह वेळ खर्च करावा लागत आहे.तीस किलोमीटरचा अधिक प्रवासपंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा व म्हसवडमार्गे पंढरपूरला जावे लागते. त्यामुळे वीस ते तीस किलोमीटर अधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा अधिक खर्च होतो....म्हणे प्रवासीच कमीकऱ्हाड -पंढरपूर, कऱ्हाड -सोलापूर, पाटण-पंढरपूर, मायणी-पंढरपूर आदी बसेस पूर्वी या मार्गावर सुरू होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. हे कारण पुढे करून या सर्व बसेस संबंधित आगाराने बंद केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ