शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सातारा : शेंडा हिरवागार... बुंध्यांना आग, कास मार्ग भकासच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:05 IST

घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देवणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर झाडे जीवंतपणी सोसतायत मरण यातनासातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ कास, बामणोली मार्ग भकासच्या मार्गावर

पेट्री (सातारा) : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश_विदेशातून बहुसंख्य पर्यटक पर्यटनस्थळी वर्षभर भेटी देतात. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक परिसरात येतात.

येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडीझुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग सौंदर्यही लोप पावले जाऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.वणवा लावणाऱ्यांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचा संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होऊ लागली आहेत.सातारा-कास मार्गावर दोन-तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबानी ते पारंबे फाटा दरम्यान देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुंध्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत.

झाडांच्या बुंध्यांची राख होते तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडली आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर पाऊले उचलून कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे असे पर्यावरणप्रेमींचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनenvironmentवातावरण