शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : निनाम परिसरात बिबट्याची दहशत, पाच दिवसांत चार कुत्र्यांचा पाडला फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:43 IST

सातारा तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देनिनाम परिसरात बिबट्याची दहशत, पाच दिवसांत चार कुत्र्यांचा पाडला फडशा

सातारा : तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने शिवारात राहणाऱ्या वस्तीतील कुत्री व शेळ््यांवर हल्ला चढवला. यात आत्तापर्यंत चार कुत्री व दोन शेळ््यांचा फडशा पाडला आहे. सध्या शेतातील कामांची धामधूम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात वनरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून बिबट्याचा मार्ग काढण्यात आला असून, बिबट्या शिवारातील उसाच्या शेतामध्ये वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वनविभागाकडून पिंजरा लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग