शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

साताऱ्यात पेढी कुठलीही २२ कॅरेटचा दर मात्र एकच, सराफ असोसिएशनचा निर्णय

By प्रगती पाटील | Updated: April 8, 2024 17:24 IST

ग्राहकांच्या पैशांची होणार बचत

सातारा : भारतातील इतिहासात पहिल्यांदाच साताऱ्यात, सातारा सराफ असोसिएशनने २२ कॅरेट दागिन्यांचे दर सर्व दुकानांमध्ये एकसारखे ठेवण्याचा निर्णय एक मताने घेतला आहे. हा निर्णय सोने खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या हितासाठी घेतला आहे आणि तो नक्कीच सातारकरांना लाभदायक ठरेल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.सातारा सराफ असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची नुकतीची निवड करण्यात आली. यात  अध्यक्षपदी प्रफुल नागोरी, उपाध्यक्षपदी नितिन घोडके, चेतन जैन, धोंडीराम पाटील, सचिवपदी पंकज नागोरी, सह-सचिव राहुल करमाळकर, खजिनदार जितेंद्र राठोड, आणि कार्यकारनि समिती सदस्य, चंद्रशेखर घोडके, संजय जैन, प्रविण देवी, किशोर देवी, नामदेव गिड्डे, कल्पेश जैन, मुकेश जैन, रमेश घाडगे, अतुल घोडके आणि चंदन महामुने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारत व्यावसायिक दृष्ट्या कॉपोरेटे संस्कृतीच्या रूपात रूपांतरित होत आहे, सर्व सामान्य आणि मध्यम व्यावसायिक /उद्योजकांना व्यावसायिक दृष्टीने संघर्ष करावा लागत असतो, तसेच ग्राहकांच्या मागण्यांना लक्षात घेता नूतन निवडलेल्या अध्यक्ष आणि त्यांच्या टीमने ग्राहकांच्या फायद्यासाठी अणि हितासाठी हा सरळ आणि सोपा उपाय काढला आहे. सोन्याच्या दरात एक सारखेपणा असावा असा निर्णय घेतल्याने सातारा सराफा बाजारातील येणाऱ्या ग्राहकांना योग्य दरात सर्वोत्तम कलाकुसरीचे असणारे दागिने या निमित्ताने मिळणार आहेत.

ग्राहकांच्या पैशांची होणार बचतसाताऱ्यात सराफी पेढीमध्ये सोने खरेदी करायला गेले की प्रत्येकाचे सोन्याचे दर वेगवेगळे होते. कोणी मजुरीचा दर वेगळा सांगायचे तर कोणी घडणावळीबाबत वेगळे नियम सांगायचे. एकुणच या सर्व प्रकारांमुळे ग्राहक हैराण व्हायचे. कोणावर भरवसा ठेवायचा आणि कुठून योग्य दरात सोने खरेदी करायचे याविषयी असणारा संभ्रम असोसिएशनच्या या निर्णयामुळे संपुष्टात आला आहे. असोसिएशनच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार असून यामुळे स्थानिक सराफी पेठेला उर्जितावस्था येणार आहे. 

वर्षानुवर्ष सोन्याचे दर सरासरी १० ते १५ टक्के वार्षिक वाढतात. त्याचा थेट फायदा सोन्यात गुंतवणूक करणार्यांना होतो. गुंतवणुकीचा स्वर्ग म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. म्हणून येणाऱ्या हिंदू नवं वर्षाला म्हणजे पाडव्याला सोने खरेदी करून आपले भविष्य उज्वल आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत करा. - प्रफुल्ल नागोरी, अध्यक्ष सातारा सराफ अससोसिएशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGoldसोनं