शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : चक्क मंडप लावून कलिंगडची विक्री, उन्हाळ्यात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:52 IST

उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडावा देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क मंडप टाकले आहेत.

ठळक मुद्दे चक्क मंडप लावून कलिंगडची विक्री पालखी मार्गावर पंधरा ठिकाणी रसवंतीगृह तर बारा कलिगंडाचे स्टॉल

तरडगाव : उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडावा देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क मंडप टाकले आहेत.जसजसा एप्रिल महिना संपत आहे, तसे सूर्यनारायण आग ओकत आहेत. यामुळे शेतकरी तर शेतातील कामे दिवस उजाडण्यापूर्वी व संध्याकाळी मावळत्या वेळी करत आहेत. यंदा कडक उन्हाचे चटके भलतेच बसत आहेत.या मार्गात रस्त्याकडेला झाडेच नसल्याने दुपारच्या सुमारास प्रवास करणाऱ्यास या शीतगृहांचा आसरा घ्यावाच लागत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाºया प्रवाशांची उन्हामुळे दमछाक होत आहे. रस्त्यावरून जाताना एखादे रसवंतीगृह अथवा कलिंगडाचे स्टॉल दिसल्यास त्याकडे गाडीचे स्टिअरिंग आपोआप वळत आहे.रस्त्याकडेला ठिकठिकाणी मोक्याच्या जागेत मोठा मंडप उभारून त्यामध्ये विविध प्रकारचे गारवायुक्त स्टॉल दिसत आहेत. तसेच एरव्ही वडापाव विकणारे हातगाडे आता उन्हाळ्यात लिंबू सरबत विकत आहेत. शेतकरीही कलिंगडाच्या फोडी करून पैसा कमवत आहेत. प्रवासी कोरड पडलेल्या घशाला व संपूर्ण शरीराला गारवा म्हणून त्यावर ताव मारीत आहे. या मार्गातील विविध गावच्या बसस्थानक परिसरात आईस्क्रिमचे हातगाडे उभे दिसत आहेत. तसेच परिसरातील दुकानांमधून पाण्याच्या बाटल्या टांगलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत.रसवंतीगृहात देखील भलतीच गर्दी पाहावयास मिळत आहे. चौपदरीकरणाच्या कामात मोठी झाडे नष्ट झाल्याने लोणंद-फलटण रस्त्याच्या कडेला झाडांची गार झुळूकही लागत नाही. यामुळे प्रवास करताना क्षणभर विश्रांती असे म्हणत दुचाकीस्वार आपल्या बालचमूसह रस्त्याकडील अशा स्टॉलमध्ये थांबून उसाच्या रसाचा आस्वाद घेत आहेत. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfruitsफळेTemperatureतापमान