शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  पावसाचा जोर ओसरला तरी धरणे भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:40 IST

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर ओसरला तरी धरणे भरण्याच्या मार्गावरकोयनेत ८६.७९ टीएमसी पाणी : प्रमुख सर्व धरणांत ८० टक्क्यांच्यावर साठा

सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. पश्चिम भागातील भात लागण आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर ओसरला असला तरी प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग आठ दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला होता. तर बुधवारपासून पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे २१०० क्युसेक पाणी सोडणेही थांबविले आहे.गुरुवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरणात ८६.७९ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण ८२.४६ टक्के भरले आहे. धोम धरण ८३.७८ टक्के, कण्हेर ८१.९६, बलकवडी ८४.९६, उरमोडी ८५.८५ तर तारळी धरण ८४.९३ टक्के इतके भरले आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०१ (४८३ )कोयना १११  (३६०७)बलकवडी १९  (१८३६)कण्हेर ०० (५७५​​​​​​​)उरमोडी ०६( ८८४​​​​​​​​​​​​​​)तारळी ०७ (१६११​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण