शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सातारा : त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:07 IST

आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ठळक मुद्दे त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलकदापोलीतील नागरिकांकडून मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली

सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात सुमारे आठशे फूट खोल दरीत मिनी बस कोसळून तीस जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. २८ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या आठवणी आजही काळीज पिळटवून टाकतात.

या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील काही नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. अशा आशयाचा फलकही घटनास्थळी लावण्यात आला आहे.महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुटी असल्याने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वरला पिकनिकसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दि. २८ जुलै रोजी कृषी विद्यापीठाचीच बस त्यांनी भाड्याने घेतली होती. सकाळी सात वाजता सर्वजण कृषी विद्यापीठात एकत्र आले. त्यानंतर पुढील प्रवासाला निघाले.

बसमध्ये एकूण ३१ जणांचा समावेश होता. बसमधील सर्व कर्मचारी विनोद करत होते. त्यामुळे सर्वजण मोठ-मोठ्याने हसू लागले. चालक प्रशांत भांबेड यालाही हसू आवरता आले नाही. एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि इथेच घात झाला. आंबेनळी घाटातील दाभिळ टोकाजवळ बस उजव्या बाजूला असलेल्या आठशे फूट दरीत कोसळली.या अपघातात बसमधील ३० जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. तर एकजण बचावला होता. एनडीआरएफ, महाबळेश्वर, पोलादपूर, खेड, महाड, दापोली येथील ट्रेकर्सचे जवान व पोलिसांनी सलग २४ तास मदतकार्य करून दरीतील मृतदेहबाहेर काढले होते. या अपघाताच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो. अपघातातील मृतांचे सर्वांना कायम स्मरण व्हावे, यासाठी दापोली येथील नागरिकांनी मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

या अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करण्यात आले आहे. अशा आशयाचा फलकही घटनास्थळी लावण्यात आला असून, त्यावर काळाने घाला घातलेल्या मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीह्ण असे शब्दही लिहिण्यात आले आहेत. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे