शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट, कारवाईबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:15 IST

सातारा शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे. दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसातारा शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेटकारवाईबाबत यंत्रणेचे  दुर्लक्ष

सातारा : शहरात बेकायदा गुटखा विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. पानटपऱ्यां, किराणा विक्री दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे.दुकानांच्या परिसरात गुटख्यांच्या पुड्यांचा खच पडतो. मात्र कारवाईबाबत यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही गुटखा विक्री केली जात असल्याचे पुढे येत आहे. गुटख्याच्या बॅगा भरुन संबंधित पानटपऱ्या, दुकानांमध्ये वितरित केल्या जातात. यातून बक्कळ कमाई केली जात आहे.

गुटखा विक्रीवर बंदी असल्याने चढ्या भावाने गुटखा विकला जात आहे. शहराबाहेरच्या एखाद्या खेड्यात कारवाई दाखवून शहरातील राजरोसपणे सुरु असलेल्या या बेकायदा कृत्याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे.सातारा शहरात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये खुलेआमपणे गुटखा विक्री केली जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व निमिष शहा यांनी दिला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शाळा, कॉलेजजवळ अशा प्रकारे गुटखा विक्री केली जात आहे. १५ दिवसांत ही कारवाई केली गेली नाही तर शिवसेना आपल्या कार्यालयाला टाळे ठोकेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस