शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : एकीकडे झाडांचे संवर्धन; दुसरीकडे वणवा, आगी लावण्याच्या घटनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 16:00 IST

प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.

ठळक मुद्देकास परिसरात सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांना पाणीदुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार

पेट्री : प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार परिसरात वारंवार लावण्यात आलेल्या वणव्याच्या आगीत आत्तापर्यंत शेकडो टन चारा नष्ट झाला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने कित्येक वृक्ष होरपळले गेले आहेत. वनसंपदेबरोबरच प्राणीही धोक्यात येऊ लागले आहेत. तसेच अनेक पशुपक्ष्यांच्या निवाºयाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.सामाजिक वनीकरण विभागाद्वारे या गणेशखिड परिसरात हजारोंच्या संख्येने पावसाळ्यात झाडे लावण्यात आली होती. या रोपांना महिन्यांतून दोनवेळा असे साधारण दर महिन्याला २२ टँकरद्वारे पाणी वृक्षसंगोपनासाठी घातले जात आहे.अविवेकी मनोवृत्ती असणाऱ्यांकडून एका बाजूला हा परिसर भकास करण्याचेच काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुला समाजिक संस्था, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रशासनाकडून जीवाचे रान करून वृक्षांचे रक्षण, संवर्धन करतानाचे चित्र दिसत आहे. 

सध्यस्थितीला वातावरणात दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसेच वणवा पेटविणाऱ्या विघ्नसंतुष्टी लोकांकडून झाडांचे संरक्षण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपणा सर्वांवरच येऊन पडली आहे.- ओम जाधव,पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी