शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

सातारा : नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

बाजारपेठेत गर्दी : व्यापाऱ्यांनी केली सूरत आणि गुजरातहून खरेदी

सातारा : नवरात्रोत्सवाच्या पूर्व संध्येला साताऱ्यातील बाजारपेठ चांगलीच सजली आहे. रंगीबेरंगी सजवलेली कपडे, आकर्षक दांडिया, अल्हाददायक मोजडी आणि आकर्षक रंगसंगतीचे दागिने या सर्वांच्या हजेरीने बाजारपेठ अक्षरश: नटली आहे.साताऱ्याच्या बाजारपेठेत नवरात्रीनिमित्त गुजराथी पेहराव दाखल झाले आहेत. यासाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूरत आणि गुजरातहून खरेदी केल्याचे चित्र दिसते. दांडिया आणि गरबा खेळताना पारंपरिकतेचा लूक येण्यासाठी खास करून तरुणाई सजग आहे. त्यामुळे बाजारपेठेत उपलब्ध असलेले अनेक पर्याय धुंडाळण्याचे काम सध्या सुरू आहे.तरुणींनी या दिवसात देखणे दिसण्यासाठी ‘मिक्स अ‍ॅन्ड मॅच’चा नवा फंडा आजमविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पारंपरिक वेशभूषेला आधुनिक केशरचना करण्यासाठीचे नवनवीन प्रयोग अनेक पार्लरमध्ये सुरू आहेत. तरुणांसाठीही बाजारपेठेत कपडे उपलब्ध आहेत. केवळ सणासाठी पारंपरिक कपडे खरेदी करण्यापेक्षा काहीनी सलग नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे पारंपरिक ड्रेस ड्रेपरीच्या दुकानात जाऊन फायनल करून ठेवले आहेत. यंदा कटाक्षाने जिन्स आणि टी शर्टला फाटा देत तरुणाईने पारंपरिक वेशभूषेत राहण्याचे ठरविले आहे.तरुणाई बरोबरच महिलांही या सर्व प्रकारात आघाडीवर आहेत. स्वत:चे बिशी ग्रुप आणि बचत गटाच्या महिलांना एकत्र करून महिलांनीही दांडियाची तयारी केली आहे. यावर्षी देवीच्या नऊ रंगांप्रमाणेच नऊ दिवस साड्या नेसण्याचा संकल्पही केला आहे. अनेक ठिकाणी महिलांना दांडियाचे प्रशिक्षण देण्याचे वर्गही जोरकसपणे सुरू आहेत. दांडियाचे प्राथमिक धडे घेऊन या महिलाही यंदा दांडिया आणि गरबा उत्साहात खेळणार असे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)यावर्षी नवरात्रीनिमित्त पारंपरिक दांडियाचे ड्रेस घेण्याकडे तरुणाईचा ओढा आहे. काहीनी ड्रेपरी दुकानांमध्ये जाऊन याचे बुकिंग केले आहे. तर काहीनी ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’चा नवा फंडा अवलंबत या उत्सवात रंगत आणण्याचे ठरविले आहे.नवरात्रीत कपड्यांबरोबरच दांडियाही महत्त्वाच्या असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या दांडिया नेऊन त्यावर आपला खास ‘टच’ देण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर जरदोसी आणि मोती वर्कला पसंती देण्यात येत आहे.दांडिया खेळायला जाताना पारंपरिक लूक दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणे दागिन्यांचाही वापर केला जातो. यावेळी ‘स्टोन आॅरनामेंट’ला चांगली मागणी आहे. याबरोबरच मोती, खडे आणि ग्लिटरिंग हे पारंपरिक प्रकार दागिन्यांमध्ये आवडीचे आहेत.गणेशोत्सवामध्ये डॉल्बीच्या दणदणाटामुळे भींत कोसळल्याचा आरोप होत असतानाच नवरात्रोउत्सवामध्येही आम्हाला डॉल्बी वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी शहरातील मंडळांनी पोलिसांकडे मागणी केली. मात्र पोलिसांनी मंडळाची मागणी धुडकावली. रात्री दहापर्यंत दांडीया खेळण्यास परवानगी असून अचारसंहितेचे पालन करण्यासाठी राजकीय व्यक्तींना तेथे बोलावू नये.