शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

सातारा : भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत खामकर यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:53 IST

सातारा : सातारा पालिकेतील भाजप चे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. प्रशांत खामकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपुर्द केला.खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालिकेतील मनोमिलन तुटल्यानंतर दोन्ही आघाड्यांनी पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती.या निवडणुकीत खासदार गटाने पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले ...

ठळक मुद्देप्रशांत खामकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपुर्द

सातारा : सातारा पालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. प्रशांत खामकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपुर्द केला.खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालिकेतील मनोमिलन तुटल्यानंतर दोन्ही आघाड्यांनी पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती.

या निवडणुकीत खासदार गटाने पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी भाजपच्या पाच नगरसेवकांनी विजयश्री मिळवून पालिकेत चंचूप्रवेश केला होता.या निवडणुकीनंतर भाजपच्या वतीने नगरसेवक अ‍ॅड. प्रशांत खामकर यांची गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली होती. या पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने खामकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला. खामकर यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याचीच चर्चा आता होऊ लागली आहे.

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून शहर विकासासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पक्ष्याचा आदेश प्रमाण मानूनच पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही पक्ष्य वाढीसाठी व विकासासाठी जोमाने काम करणार आहे.- अ‍ॅड. प्रशांत खामकर

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर