शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट :  लक्ष्मण माने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:35 IST

सोशल मीडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली असून, ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. या दिलगिरीनंतर सर्व बांधवांनी क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात, असे आवाहन उपराकार लक्ष्मण माने यांनी केले.

ठळक मुद्देमला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट : लक्ष्मण माने  सर्व बांधवांनी क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात

सातारा : मी महिलांचा सर्वाधिक सन्मान करणारा माणूस आहे. तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा महिलांचा प्रश्न आणून मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट सुरू आहे. सोशल मीडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली असून, ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. या दिलगिरीनंतर सर्व बांधवांनी क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात, असे आवाहन उपराकार लक्ष्मण माने यांनी केले.येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने पुढे म्हणाले, कुत्र्याला मारायचे असेल तर ते पिसाळलं आहे, असं आधी म्हणा; मग त्याला गोळी घाला, अशी व्यवस्थेनं माझी अवस्था केली आहे.

मी महिलांचा सन्मान करणारा माणूस आहे. आताही तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा महिलांचा प्रश्न आणून मला बदनाम करण्यात येत आहे. मी माझ्या भाषणात मराठा हा शब्द वापरलेला नाही. तरीही सोशल मीडियाने माझा बकरा केला आहे.

मी बोललो नाही त्या विधानाची मोडतोड करून सर्व प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. कारण, माझ्या बदनामीचा हा एक प्रकार आहे.यासंबंधी मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर म्हणणे मांडले आहे. ज्या मित्रांनी माझ्या जीवाला धोका निर्माण केला. ज्यामुळे मला पोलीस संरक्षणात राहावे लागत आहे. ठार मारण्याच्या रोज धमक्या येत आहेत. यासाठी जे मित्र जबाबदार आहेत, त्यांच्यावरती फौजदारी व अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करणार आहे, असेही माने यांनी यावेळी सांगितले.शिवराम ठवरेंवर आरोप...या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुमचे हितशत्रू कोण, त्याचे नाव काय ? असा प्रश्न केल्यावर माने यांनी शिवराम ठवरे यांचे नाव सांगितले. तसेच ठवरे हे साताऱ्याचेच असून, त्यानेच माझा नंबर व्हायरल केला. मी त्याच्याविरोधात फौजदारी व अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणाार आहे, असेही यावेळी माने यांनी सांगितले.

टॅग्स :marathaमराठाSatara areaसातारा परिसर