शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  एकट्या कोरेगाव आगाराला सात निमआराम गाड्या, प्रवाशांच्या खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:22 IST

एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम बसेसमुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.

ठळक मुद्देएकट्या कोरेगाव आगाराला सात निमआराम गाड्या, प्रवाशांच्या खिशाला झळ कोरेगाव-पुणे प्रवास महागल्याने व्यापाऱ्यांमधून नाराजी

कोरेगाव : एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम बसेसमुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.कोरेगाव, वडूज व दहिवडी आगार अनेक वर्षांपूर्वी महामंडळाने या आगारातून निमआराम बसेस लांब पल्ल्यासाठी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार म्हसवड-मुंबई, वडूज-मुंबई, कोरेगाव-मुंबई, कोरेगाव-स्वारगेट व सातारा-हैद्राबाद मार्गावर निमआराम बसेस धावत होत्या. मात्र प्रवासी उत्पन्न कमी येत असल्याचे कारण दाखवून त्या वेळोवेळी बंद देखील केल्या होत्या.साताऱ्यातून थेट स्वारगेट, मुंबई व बोरीवलीसाठी दर तासाला विनावाहक-विना थांबा निमआराम बससेवा सुरू झाली. त्यानंतर कोरेगाव, वडूज व दहिवडी आगारांतील लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. साताºयातून थेट सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांनी कधीही तक्रारी केल्या नाहीत.सध्या महामंडळाने शिवशाही बसेस आणल्या आहेत. साताऱ्यातून थेट स्वारगेट, मुंबई व बोरीवलीसाठी शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत. कऱ्हाड व महाबळेश्वर आगारातूनही लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत. शिवशाही बसेस ताफ्यात आल्याने सातारा व महाबळेश्वर आगारातील निमआराम बसेस ग्रामीण आगारांना दिल्या.एकट्या कोरेगाव आगाराला तब्बल सात बसेस दिल्या आहेत. सातारा-सोलापूर मार्गावर हैद्राबाद बसचा अपवाद वगळता कधीही निमआराम गाडी धावली नाही. मात्र आता साताऱ्यासह सोलापूर विभागाच्या विविध आगारांच्या निमआराम बसेस या मार्गावर धावत असल्याने प्रवाशांना महागडा प्रवास करावा लागत आहे.

कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदारांना तर निमआराम बसेस शिवाय पर्याय उरत नसल्याने अनेकांची पावले आता खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळू लागली आहेत. दीडपट तिकीट असल्याने अनेकजण निमआराम बसेस सोडून साध्या बसेसची वाट पाहत थांब्यावर थांबत असल्याचे चित्र आहे.कोरेगावातील व्यापारी नाराजकोरेगाव-स्वारगेट मार्गावर निमआराम बसेस धावत असतात. सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या बसला नेहमी गर्दी असते. कोरेगावातील व्यापारी पुण्यातील खरेदीसाठी जाताना या बसचा वापर करतात. काही दिवसांपासून निमआराम बस या मार्गावर सोडली जात असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर