शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मान्सूनचा नुसताच वारा; पावसावरच भरवसा सारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:05 IST

सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.

ठळक मुद्देमान्सूनचा नुसताच वारा; पावसावरच भरवसा सारा !शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून : पेरणी रखडणार; पश्चिम भागातही विश्रांती

सातारा : जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात सहा दिवसानंतरही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. तसेच धरण क्षेत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला असलातरी पुन्हा त्याचे प्रमाण कमी होत आले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात २४ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर बुधवारी सकाळपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस झालेला. याचाच अर्थ धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.

याला कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत वाहत असणारा भिरभिर वारा. यामुळे मान्सूनचे ढग कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी एक बाब महत्त्वाची ठरली आहे ती गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणात अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात तर गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असून, धोम आणि कण्हेरमध्येही पाणीपातळी चांगली आहे.पावसाचे असे सतत भिरभिरणे सुरू असताना दुष्काळी पूर्व भागात मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. माण, फलटण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांत वळवाचा एखादा आणि मान्सूनचा कोठेतरी झालेला पाऊस यावर शेतकरी पेरणी करण्यास धजावणार नाहीत.

सध्या बाजारात बी-बियाणे उपलब्ध झालेले आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने बियांची खरेदी करावी का नको, या चिंतेत शेतकरी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMonsoon Specialमानसून स्पेशल