शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा; एकाचा मृत्यू, २४ जणांना उलटी-जुलाबचा त्रास

By नितीन काळेल | Updated: June 12, 2023 19:03 IST

खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

सातारा/ कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील वहागाव येथे धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून २४ जणांना विषबाधा झाली. त्यामुळे उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊन लागल्याने संबंधितांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, एकाचा मृत्यू झाला. तर या प्रकारानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद शिर्के यांनी गावात भेट देऊन माहिती घेतली. सध्या सर्व स्थिती आटोक्यात आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, वहागाव येथे ९ जून रोजी धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्ताने जेवणाचा बेत करण्यात आलेला. गावातील व बाहेरील असे मिळून एकूण ३५ जणांनी येथील जेवण केले होते. मात्र, त्यातील २४ लोकांना जेवणानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना कऱ्हाड आणि विटा (जि. सांगली) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. यामधील बहुतांशी नागरिकांची प्रकृती चांगली होऊ लागली आहे. तर एकास जास्त त्रास होत असल्याने कऱ्हाडमधीलच खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, संबंधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आरोग्य विभागास सूचना केली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद शिर्के यांनी वहागावला भेट दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनील चव्हाण उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना केली. त्यानंतर उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात घरोघरी भेट देऊन माहिती घेतली. तर घटनास्थळावरुन भाकरी, तांदूळ आदीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर संबंधित घरातील ५ लोकांचे स्टुल सॅम्पल आणि पाणी नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी ते जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन आहे की सध्या उन्हाळ्यासारखी स्थिती असून शिळे अन्न पदाऱ्थ खाऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमात जेवण करताना सर्व प्रकारची काळजी घेण्याची गरज आहे. - डाॅ. प्रमोद शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी 

वहगावात अन्नातून विषबाधा झाली होती. तेथील परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. बाधित लोकांवर संपूर्ण आैषधोपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असून गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर